---Advertisement---

काय सांगता! या संघाचे सर्व फलंदाज झाले शून्यावर बाद…

On: गुरूवार, नोव्हेंबर 21, 2019 7:26 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये अनेकदा अनोखे विक्रम पहायला मिळतात पण बुधवारी(20 नोव्हेंबर) क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असे झाले की एका संघाचे सर्व 10 फलंदाज शून्य धावेवर बाद झाले. हा अनोखा विक्रम मुंबईतील हॅरिस शिल्ड स्पर्धेतील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय स्कूल विरुद्ध चिल्ड्रेन्स वेल्फेअर सेंटर स्कूल या सामन्यात झाला आहे.

या सामन्यात स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय स्कूलने दिलेल्या 762 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चिल्ड्रेन्स वेल्फेअर सेंटर स्कूलचे सर्व 10 फलंदाज शून्य धावेवर बाद झाले आहेत.

या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या स्वामी विविकानंद आंतरराष्ट्रीय स्कूलकडून मीत मयेकर या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फलंदाजाने नाबाद 338 धावा केल्या. यामध्ये त्याने तब्बल 56 चौकार आणि 7 षटकार मारले.

त्यातच चिल्ड्रन्स वेलफेअर सेंटर स्कूल संघाने 45 षटके निर्धारित वेळेत पूर्ण न केल्याने त्यांना 156 धावांची पेनल्टी मिळाली. तसेच त्यांनी गोलंदाजी करताना 57 अतिरिक्त धावाही दिल्या. त्यामुळे स्वामी विविकानंद आंतरराष्ट्रीय स्कूलची धावसंख्या 4 बाद 761 एवढी झाली.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या चिल्ड्रन्स वेलफेअर सेंटर स्कूल संघाच्या फलंदाजांना स्वामी विविकानंद आंतरराष्ट्रीय स्कूलच्या गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. त्याचे सर्व फलंदाज 6 षटकात शून्य धावेवर पॅव्हेलियनमध्ये परतले.

स्वामी विविकानंद आंतरराष्ट्रीय स्कूलच्या अलोक पालने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. यात त्याच्या हॅट्रिकचाही समावेश होता. तर वरद वझेने 2 विकेट्स घेतल्या. चिल्ड्रन्स वेलफेअर सेंटर स्कूल संघाचे तब्बल 6 फलंदाज त्रिफळाचीत झाले. तर 2 फलंदाज धावबाद झाले आणि 2 फलंदाज पायचीत बाद झाले.

तसेच चिल्ड्रन्स वेलफेअर सेंटर स्कूल संघाला 7 अतिरिक्त धावा मिळाल्यामुळे त्यांची धावसंख्या सामना संपल्यानंतर सर्वबाद 7 धावा अशी होती. त्यामुळे स्वामी विविकानंद आंतरराष्ट्रीय स्कूलने हॅरिस शिल्डच्या 126 वर्षातील इतिहासातील सर्वात मोठा विजयही मिळवण्याचा पराक्रम केला.

संक्षिप्त धावफलक :

स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय स्कूल – 4 बाद 761 धावा

(मीत मयेकर- नाबाद 338धावा)

चिल्ड्रेन्स वेल्फेअर सेंटर स्कूल – सर्वबाद 7 धावा

(आलोक पाल – 6 विकेट्स , वरद वझे – 2 विकेट्स).

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---