काही वर्षांपुर्वी क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंच्या कामगिरीमुळे माध्यमांमध्ये बातम्या होतं असतं. खेळाडूंची कामगिरी हीच माध्यमांसाठी महत्त्वाची असे. नंतर चाहत्यांनीही खेळाडूंच्या वैयक्तिक जिवनात लक्ष द्यायला सुरुवात केली. याच काळात माध्यमेही खेळाडूंच्या वैयक्तिक जिवनावर बातम्या करु लागली.
याची अगदी सुरुवात पहायची असेल तर सचिन तेंडूलकर व अंजली तेंडूलकर यांनी करता येईल. सचिन-अंजलीवर अनेक बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. आज खेळाडूंना क्रिकेट व वैयक्तिक जिवन फारसे वेगळे करता येत नाही. खेळाडूंच्या पत्नी या सामन्यांना हजेरी लावतात. त्यामुळे याची चर्चा सर्वत्र होते. परंतु चाहत्यांना नेहमी एक प्रश्न असतोच, की या खेळाडूंच्या पत्नी वैयक्तिक जिवनात करतात तरी काय? तर सांगायला नक्कीच चांगलं वाटेल की २१व्या शतकात खेळाडूंच्या पत्नी या खऱ्या अर्थाने सक्षम असून त्या आपआपल्या क्षेत्रात चांगले नाव कमवत आहे. केवळ एखाद्या क्रिकेटरची पत्नी हाच शिक्का त्यांच्यावर लावण्याचे दिवस आता मागे पडले आहेत.
१०. एमएस धोनी- साक्षी सिंग धोनी (MS Dhoni- Sakshi Singh )
भारतात सर्वाधिक चर्चा झालेले व ज्या जोडीवर एक चित्रपट तयार झाला आहे ती अर्थात एमएस धोनी व साक्षी सिंग धोनी. २०१०मध्ये धोनी व साक्षीचे लग्न झाले. २०१५मध्ये त्यांना झिवा नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले.
साक्षी अनेक वेळा मैदानावर संघाला पाठींबा देण्यासाठी हजर असते. तीने हाॅटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतले असून ताज बेंगाॅल वगैरे सारख्या मोठ्या हाॅटेल्समध्ये नोकरीही केली आहे. ती याच हाॅटेलमध्ये एमएस धोनीला पहिल्यांदा भेटली होती. लग्नानंतर मात्र तीने नोकरी सोडून दिली असून घरातील जबाबदाऱ्या पार पाडते.
९. अजिंक्य रहाणे- राधिका धोपवाकर (Ajinkya Rahane- Radhika Dhopvakar )
मधल्या फळीत खेळणारा व भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असलेल्या रहाणेने २०१४मध्ये राधिका धोपवाकरसोबत लग्न केले. ते एकमेकांना काॅलेज जिवनापासून ओळखतात. राधिका इंटेरियर डिजाईनर आहे.
राधिकाचे वडिल भारतीय नौदलात काम करत होते. त्यानंतर त्यांनी टुरिझम क्षेत्रात काम सुरु केले. राधिकाने कधीही स्टेडियमवर सामन्यांना हजेरी लावली नाही. परंतु तीला बऱ्याच वेळा रोहित शर्माची पत्नी रितीकाबरोबर प्रेक्षाकांनी पाहिलं आहे.
८. आर अश्विन- प्रिथी नारायणन (Ravichandran Ashwin- Prithi Narayanan)
अगदी लहानपणापासून एकमेकांचे मित्र असलेल्या आर अश्विन व प्रिथी नारायणन यांनी २०११मध्ये लग्न केले. ते दोघेही एसएसएन काॅलेज ऑफ इंजीनिअरिंगचे विद्यार्थी होते. तीने बीटेक माहिती तंत्रज्ञान विषय़ात केले आहे. प्रिथीने अनेक कंपन्यांमध्ये इंजीनीअर म्हणून काम केले आहे. आश्विनला दोन कन्या असून कन्यारत्न प्राप्तीनंतर प्रिथीने नोकरी करणे सोडले आहे. आराध्या व अकिरा असे अश्विच्या मुलींची नावे आहेत. प्रीथी नेहमी स्टेडियममध्ये आश्विनला सपोर्ट्स करण्यासाठी येत नाही.
७. सुरेश रैना- प्रियांका चौधरी (Suresh Raina- Priyanka Choudhary)
गेले बरेच महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुर असलेल्या सुरेश रैनाने साॅफ्टवेअर इंजिनीयर प्रियांका चौधरीशी विवाह केला आहे. लग्नापुर्वी प्रियांका नेदरलॅंडमध्ये राहत होती. २०१५मध्ये लग्न झालेल्या या जोडीने ग्रेसिया नावाच्या मुलीला २०१६मध्ये जन्म दिला. प्रियांका एक फूटबाॅल खेळाची चाहती आहे.
तीने आपले शिक्षण साॅफ्टवेअर इंजीनीअर म्हणून पुर्ण केले असून एक आयटी प्रोफेशनल म्हणून तीने नेदरलॅंडमध्ये काम केले आहे. यात एक्सेन्जर, विप्रोसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. सध्या ती बालकांसाठी सुरु केलेल्या एनजीओमध्ये काम पाहते. या एनजीओमधून महिला व बालकांबद्दल समाजात जनजागृतीचे काम केले जाते. २०१७मध्ये टेड टाॅकमध्ये तीने भाषणही दिले आहे.
६. हरभजन सिंग- गीता बसरा (Harbhajan Singh- Geeta Basra)
भारतीय संघातील फिरकीपटू हरभजन सिंगने गीता बसरा या बाॅलीवुड अभिनेत्रीसोबत लग्न केले आहे. या पंजाबी अभिनेत्रीसह भज्जी अनेक वर्ष डेट करत होता. या दोघांना एक मुलगी आहे. गीताने दिल दिया हैं, द ट्रेन, सेकंड हॅंड हसबंड, जिला गाझीयाबादसारख्या चित्रपटांत काम केले आहे. तसेच राहत फते अली खान यांच्या अल्बममध्येही ती दिसली आहे. लग्नानंतर तीने कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. आयपीएल सामन्यांदरम्यान ती स्टेडियममध्ये बऱ्याच वेळी दिसली आहे.
५. रविंद्र जडेजा- रिवा सोलंकी (Ravindra Jadeja- Riva Solanki )
भारतीय संघाचा अष्टपैलू स्टार खेळाडू रविंद्र जडेजाने रिवा सोलंकीशा लग्न केले . ते दोघे एका पार्टीमध्ये भेटले होते व पुढे अतिशय कमी कालावधीत त्यांनी लग्न केले. राजकोटमधील आत्मिया इंस्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी आणि सायन्समधून तिने मेकॅनिकल इंजीनिअरिंगची पदवी घेतली आहे.
२०१९मध्ये रिवाने भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केला आहे. तिला राजकारणात कारकिर्द घडवायची आहे. रिवाचे माहेरकडेच बरेच लोक हे राजकारणात आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापुर्वी ती करणी सेनाच्या गुजरात विंगची प्रमुख होती.
४. केदार जाधव- स्नेहल जाधव (Kedar Jadhav- Snehal Jadhav)
मराठमोळा क्रिकेटर केदार जाधवची पत्नी स्नेहन जाधव ही देखील क्रिकेट खेळली आहे. तीने महाराष्ट्र तसेच पश्चिम विभागाकडून क्रिकेट खेळले आहे. दुर्देवाने तिला भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. ती हैद्राबाद व ओरिशा असा दोन संघांकडूनही क्रिकेट खेळली आहे.
तिच्या नावावर ३७ अ दर्जाचे, १ प्रथम श्रेणी व ३१ टी२० सामन्यांची नोंद आहे. २०१५मध्ये या जोडीला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तेव्हापासून तीने क्रिकेट खेळणे सोडले असून केदार खेळत असलेल्या सामन्यांना ती परिवारासह हजेरी लावते.
३. रोहित शर्मा- रितीका सजदेह (Rohit Sharma- Ritika Sajdeh)
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचे लग्न स्पोर्ट्स मॅनेजर असलेल्या रितीका सजदेहबरोबर झाले आहे. क्रिकेटपटूंसोबत खूप चांगले संबंध असलेल्या व्यक्तींमध्ये रितीकाचा समावेश होतो. रितीका लग्नापुर्वी रोहितची स्पोर्ट्स मॅनेजर होती. ती तिच्या चुलत भावाची कंपनी काॅर्नरस्टोन स्पोर्ट्स व इंटरटेनमेंटमध्ये स्पोट्स मॅनेजर म्हणून काम करत होती. तीची हरभजन सिंग, युवराज सिंगबरोबर रोहित माहित होण्यापुर्वीपासून चांगली मैत्री आहे. तिचा भाऊ रिलांयन्स आयमजीमध्ये काम करतो तर लग्नानंतर रितीकाने रोहितचे सर्व व्यावसायिक करार सांभाळले आहे. ती त्याची मॅनेजर आहे.
२. दिनेश कार्तिक- दिपीका पल्लिकल (Dinesh Karthik- Deepika Pallikal)
२०१३मध्ये दिनेश कार्तिक व भारतीय स्काॅश खेळाडू दिपीका पल्लीकल एकमेकांना भेटले व ३ वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी २०१५मध्ये लग्न केले. त्यांनी ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. दिपीका ही एक मोठी स्काॅशपटू आहे. पीएसएच्या क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये येणारी ती पहिली भारतीय महिला स्काॅशपटू आहे. तिच्या नावावर कारकिर्दीत १० विजेतेपदं आहेत. २०१४ काॅमनवेल्थ गेम्समध्ये तीने जोत्स्ना चिनप्पाबरोबर सुवर्णपदक मिळवले होते. तिला अर्जुन पुरस्कार तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
१. विराट कोहली- अनुष्का शर्मा (Virat Kohli- Anushka Sharma)
भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा बाॅलीवूड अभिनेत्री आहे. तीने २००८ पासून आजपर्यंत २० चित्रपटांत मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
इतकेच नव्हे तर विराट आणि अनुष्काचा देशातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटीजमध्ये समावेश होतो. तरीही विराटच्या कमाईपुढे अनुष्काची कमाई कमी असली तरी या जोडीकडे खूप पैसे आहेत. विराटने नुकत्याच २०१९च्या फोर्ब्स सेलिब्रिटी १०० च्या यादीत अव्वल क्रमांक पटकाविला. तर अनुष्का २१ व्या क्रमांकावर विराजमान होती.
विराटकडे एकूण ९०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर दुसरीकडे अनुष्काने २०१९मध्ये २८.६७ कोटी रुपयांची कमाई केली होती. अनुष्काकडे ३५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. अशाप्रकारे विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
महा स्पोर्ट्स टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@MahaSports) जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी मिळवा.
ट्रेंडिंग घडामोडी –
–३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्यांनी केले आहे महिला क्रिकेटरशी लग्न
–१० भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी व त्या करत असलेलं काम
–घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारे ५ भारतीय क्रिकेटर्स
–दोन वेळा लग्न केलेले १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, ५ नावे आहेत भारतीय
–आणि झाली शिखर धवनची लव्हस्टोरी सुरु