---Advertisement---

टीम पेनची बडबड झाली सुरु, किंग कोहलीच्या टीम इंडियाला दिले मोठे टेन्शन

On: बुधवार, एप्रिल 1, 2020 3:34 PM
---Advertisement---

या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. यातील एक सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. याच मालिकेबद्दल बोलताना ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने आपले मत व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना पेन (Tim Paine) म्हणाला की, स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) या धडाकेबाज खेळाडूंच्या अनुभवाच्या मदतीने यावर्षाच्या शेवटी होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ मजबूत कामगिरी करेल.

मागील वर्षी पेनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया (Australia) संघ आपल्याच मायदेशात भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पराभूत झाला होता. परंतु त्यावेळी वॉर्नर आणि स्मिथ चेंडू छेडछाड प्रकरणामुळे संघातून बाहेर होते.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल बोलताना पेन म्हणाला की, “हा वेगळा भारतीय संघ (Team India) आहे आणि आत्ताचा ऑस्ट्रेलिया संघही वेगळा असेल. पण दोन्ही संघ उच्च दर्जाचे आहेत. या मालिकेत चांगले क्रिकेट पहायला मिळेल. आम्ही या मालिकेची वाट पहात आहोत.”

यादरम्यान स्मिथला कर्णधारपद देण्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पेन म्हणाला की, “तो कोणत्याही क्षणी स्मिथला कर्णधारपद देण्यासाठी तयार आहे. ऑस्ट्रेलिया संघात ट्रेविस हेड (Travis Head) आणि मार्नस लॅब्यूशाने (Marnus Labuschagne) यांसारखे खेळाडू आहेत. हे खेळाडू संघाची धुरा सांभाळू शकतात.”

तरीही पेनने ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार म्हणून काम सुरूच ठेवले आहे, ज्याने कठीण काळात संघाला उभे केले, हे जस्टिन लॅंगरने (Justin Langer) आधीच स्पष्ट केले होते.

महा स्पोर्ट्स टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@MahaSports) जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी मिळवा.

ट्रेंडिंग घडामोडी-

-घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारे ५ भारतीय क्रिकेटर्स

-रोहित शर्मा म्हणतो, या खेळाडूसारखा कोच जगात नाही

-एमएस धोनी, विराट व रोहितसह १८९ खेळाडू संकटात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---