---Advertisement---

काय सांगता! एका चेंडूत बनल्या चक्क 10 धावा, कसोटी सामन्यात घडली अनोखी घटना!

On: बुधवार, ऑक्टोबर 30, 2024 5:56 PM
---Advertisement---

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतची शर्यत खूपच रोमांचक होत आहे. दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेश दौऱ्यावर पहिला कसोटी सामना जिंकला. यानंतर आता दुसऱ्या कसोटीतही त्यांची स्थिती मजबूत आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेनं यजमान बांगलादेशला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललंय. मात्र  सामन्याच्या दुसऱ्या दिवशी असं काही घडलं, ज्यामुळे अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. झालं असं की, बांगलादेशचा डाव सुरू झाला तेव्हा एका वेळी स्कोअरकार्डवर 1 चेंडूनंतर 10 धावा दिसत होत्या. आता एका चेंडूवर 10 धावा झाल्या कशा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देतो.

बांगलादेशचा डाव सुरू होताच त्यांच्या खात्यात पाच पेनल्टी धावा जमा झाल्या होत्या. या धावा बांगलादेशला एस मुथुसामी खेळपट्टीवर धावल्यामुळे मिळाल्या होत्या. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेच्या सेनुरान मुथुसामीनं या सामन्यात नाबाद 68 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान तो खेळपट्टीवर धावला होता. यामुळे दक्षिण आफ्रिकेला पाच धावांची पेनल्टी मिळाली. या पाच धावा बांगलादेशच्या खात्यात जमा झाल्या.

यानंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यानं बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी सुरू केली. पहिल्या चेंडूवर एकही धाव झाली नाही. परंतु दुसरा चेंडू नो बॉल झाला, ज्यावर बायच्या चार धावा गेल्या. अशाप्रकारे बांगलादेशच्या खात्यात आणखी पाच धावा जमा झाल्या आणि धावसंख्या एका चेंडूवर 10 धावा झाली.

 

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं सहा गडी गमावून 575 धावांवर आपला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात, बांगलादेशनं पहिल्या डावात चार विकेट गमावून केवळ 38 धावा केल्या. बांगलादेश अजूनही दक्षिण आफ्रिकेपेक्षा 537 धावांनी मागे आहे. त्यांच्या फक्त सहा विकेट शिल्लक आहेत.

हेही वाचा – 

मुंबई कसोटीत हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळणार का? सहाय्यक प्रशिक्षकांची मोठी प्रतिक्रिया
केएल राहुलनं लखनऊची साथ सोडली! लिलावात हे 4 संघ लावू शकतात मोठी बोली
‘रोहित-विराट’सह या खेळाडूंचा मुंबई कसोटी हा कारकिर्दीतील शेवटचा मायदेशी सामना? माजी प्रशिक्षकाचा मोठा दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---