विशाखापट्टनम | भारत विरुद्ध विंडीज दुसरा वन-डे सामना टाय झाला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दीडशतकी खेळी करताना वन-डे कारकिर्दीत १० हजार धावांचा टप्पा पार केला.
विराटच्या १० हजार धावांची चर्चा ही सचिनने केलेल्या १० हजार धावांइतकीच झाली. त्यामुळे जेव्हा सचिनने १० हजार धावा केल्या होत्या तेव्हा काय काय घडले होते याची जोरदार चर्चा आहे.
काय आहेत ते खास योगायोग-
१. सचिनने ३१ मार्च २००१ रोजी आॅस्ट्रेलियाविरुद्ध १२५ चेंडूत १३९ धावा करत १० हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर विराटनेही १२९ चेंडूत नाबाद १५१ धावा करत १० हजार धावांचा टप्पा गाठला. १० हजार धावा करताना शतकी खेळी करणारे विराट आणि सचिन हे दोनच खेळाडू आहेत.
२. जेव्हा सचिनने १० हजार धावांचा टप्पा पार केला होता त्या सामन्यात सचिनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. तर कालच्या सामन्यात विराटलाही सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
३. सचिन आणि विराट दोघांनीही १० हजार धावांचा टप्पा भारतातच पार केला. सचिनने हा टप्पा इंदोरला तर विराटने विशाखापट्टनमला पार केला.
४. जेव्हा सचिनने १० हजार धावांचा टप्पा पार केला तेव्हा कमी डावात १० हजार धावा करणारा तसेच वन-डेत १० हजार धावा करणारा तो पहिला खेळाडू होता. तर विराटने जेव्हा हा टप्पा पार केला तेव्हा कमी डावात अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला.
५. सचिनने ज्या मैदानावर १० हजार धावा केल्या त्याच मैदानावर विराटला ही कामगिरी करण्याची संधी होती. परंतु हा सामना इंदोरवरुन विशाखापट्टनमला काही कारणास्तव हलविण्यात आली.
६. सचिनने जेव्हा १० हजार धावांचा टप्पा पार केला होता तेव्हा त्याची वन-डेतील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १८६ होती तर विराटने जेव्हा हा टप्पा पार केला तेव्हा त्याची धावसंख्या १८३ आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–कर्णधार म्हणून विराटची केली सलग दुसऱ्या वर्षी ही विलक्षण कामगिरी
–विराट कोहली कर्णधार म्हणूनही ठरला हीट; कधीही विचार केला नाही असा विक्रम आता खिशात
–१० हजार धावा करणाऱ्या कोहलीचे हे आहेत १० खास पराक्रम