क्रिकेटटॉप बातम्या

न्यूझीलंडच्या खेळाडूने घेतला सूर्यकुमार यादवसारखाच झेल, टी20 वर्ल्ड कपच्या आठवणी ताज्या, पाहा VIDEO

सूर्यकुमार यादवने अशक्यप्राय झेल घेऊन टीम इंडियाला 2024 चा टी20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यात सूर्याने शानदार झेल घेतला होता. ज्यामुळे टीम इंडियाचा विजय निश्चित झाला. सूर्याने  शेवटच्या षटकात सीमारेषेजवळ एक शानदार झेल घेतला. आता न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने सूर्यकुमार यादवसारखाच झेल घेत टी20 विश्वचषक फायनलच्या आठवणी ताज्या केल्या.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने सीमारेषेजवळ सूर्याच्या झेलसारखाच झेल घेतला. हेन्रीच्या कॅचचा व्हिडिओ न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड म्हणजेच ब्लॅककॅप्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसून येते की, चेंडू सीमारेषेकडे जात असल्याचे पाहून सीमारेषेवर असलेला मॅट हेन्री चेंडूच्या मागे धावतो.

मागे धावताना, हेन्री सीमारेषेच्या आत जातो, पण त्याआधी तो चेंडू हवेत फेकतो आणि नंतर परत येऊन चेंडू पकडतो. सूर्यकुमार यादवनेही तेच केले होते. तोही कॅच घेताना सीमारेषेतून आत गेला होता, पण त्याआधी त्याने चेंडू हवेत फेकला होता आणि नंतर बाहेर येऊन चेंडू पकडला होता. दोन्ही झेलांचा व्हिडिओ येथे पहा…

अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता होती. आफ्रिकन संघाने 6 विकेट्स गमावल्या होत्या. संघाचा शेवटचा योग्य फलंदाज डेव्हिड मिलर क्रीजवर होता. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्याने ऑफ स्टंपवर मिलरला फुल-टॉस टाकला, ज्यावर मिलरने त्याची बॅट जोरात स्विंग केली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार होता तेव्हा सूर्याने तो झेल घेतला. यानंतर, आफ्रिकेकडे योग्य फलंदाज उरला नाही आणि नंतर भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.

हेही वाचा-

फलंदाज की गोलंदाज…क्रिकेटमध्ये कोण आहे मालामाल?
विराट कोहलीने खरोखरच युवराज सिंगची कारकीर्द संपवली? पाहा VIDEO, काय म्हणतो युवी
“खेळाडूंची पूजा भारतीय क्रिकेटला मागे ढकलत आहे”, संजय मांजरेकरांचे खडे बोल

Related Articles