---Advertisement---

आठवणीतील खेळी: कॅन्सरशी झुंज देत युवराजने १० वर्षांपूर्वी ठोकले होते ‘ते’ ऐतिहासिक शतक, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

आज २१ मार्च. आजच्या या दिवसाचे भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी भारताने कोणताही विश्वचषक जिंकला नाही किंवा कोणतीही मोठी स्पर्धा आपल्या नावे केली नाही. मात्र, आजच्या दिवशी भारतीय संघाचा अष्टपैलू युवराज सिंगने ‘संघर्ष’ या शब्दाची नवी ओळख तमाम क्रिकेटप्रेमींना करून दिली. २०११ विश्वचषकावेळी वेस्ट इंडिजविरुद्ध अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात झुंजार शतक झळकावत त्याने भारताचा स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील रस्ता सुकर केला. वेदना आणि शारीरिक त्रास होत असतानाही देशासाठी हे सर्व सहन करून ‘योध्या’ युवराजचे रूप त्याने समस्त जगाला दाखवून दिले.

अविस्मरणीय शतक
मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्याने भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशासाठी मोठा विजय मिळवणे आवश्यक होते. अशातच, भारतीय कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने ५१ धावांपर्यंत सचिन तेंडुलकर व गौतम गंभीर यांचे बळी गमावले. त्यानंतर युवा विराट कोहली व युवराज सिंग ही जोडी जमली.

दोघांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना करत तिसऱ्या गड्यासाठी १२२ धावा जोडल्या. विराट अर्धशतकानंतर बाद झाला. कर्णधार धोनीने देखील जम बसल्यानंतर युवराजची साथ सोडली. मात्र, युवराज आज काहीतरी चमत्कार करणार असे वाटत होते.
युवराजने या सामन्यात १२३ चेंडूत ११३ धावांची खेळी केली. यात १० चौकार व २ षटकारांचा समावेश होता. युवराजच्या या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने २६८ धावा धावा फलकावर लावल्या.

युवराजचे हे शतक काही साधेसुधे शतक नव्हते. या शतकावेळी युवराजला उलट्यांचा त्रास झाला. चेन्नईच्या त्या उकाड्यात त्याचे शरीर साथ देत नसतानाही तो देशासाठी मैदानावर उभा राहिला. विश्वचषक आटोपल्यानंतर युवराजला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते.

या घटनेविषयीची आठवण सांगताना युवराज म्हणतो, “त्यावेळी पंच असलेले सायमन टॉफेल मला म्हणाले, युवी तुला त्रास होत असेल तर मैदानाबाहेर जा आणि आराम कर. मात्र, मी त्यांना म्हटले मी दोन वर्षानंतर शतकाच्या उंबरठ्यावर आहे. मी बेशुद्ध झालो तरच मला मैदानातून बाहेर येऊन जा. बाद होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही. मी त्या सामन्यात ११३ धावा केल्या व संघ २६८ पर्यंत पोहोचला. मला विश्वास होता की, गोलंदाज या धावसंख्येचा नक्की बचाव करतील.”

भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी
भारतीय संघाने दिलेल्या २६९ धावांच्या आव्हानापुढे वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १८८ धावांमध्ये सर्वबाद झाला. युवराजने आपल्या चार षटकांत १८ धावा देऊन आंद्रे रसेल व डेवॉन थॉमस यांना तंबूत धाडले. त्यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला. संपूर्ण स्पर्धेत युवराजने चमकदार कामगिरी करत ३६२ धावा आणि १५ बळी मिळवत मालिकावीर पुरस्कार आपल्या नावे केला. भारतीय संघाने २८ वर्षानंतर विश्वविजेतेपद पटकावले होते या विजेतेपदाचा नायक होता युवराज सिंग.

महत्त्वाच्या बातम्या –

अफलातून! ‘लेडी सेहवाग’चा षटकार पाहून चाहतेही दंग; म्हणाले, ‘लवकरच मोडणार रोहितचा रेकॉर्ड’

आनंदाची बातमी! केरला ब्लास्टर्सला नमवत हैदराबादचा दणक्यात विजय; आयएसएल विजेतेपदावर कोरले नाव

आयपीएल सुरू होण्याच्या ६ दिवसांपूर्वीच चाहत्यांसाठी वाईट बातमी! महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---