कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगभरातील क्रिकेटची मैदाने ओसाड पडली आहेत. परंतु असे असले तरीही यादरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाने एका नवीन सदस्याचा संघात समावेश केला आहे. हे सदस्य इंग्लंडचे सर्वात लोकप्रिय व्यक्ती कर्नल टॉम मूर आहेत. इंग्लंड क्रिकेट संघाने दुसरे महायुद्ध लढणारे आणि ब्रिटीश सैनिकांचे माजी कॅप्टन टॉम यांना त्यांच्या १००व्या वाढदिवसानिमित्त संघाचा मानद सदस्य बनविले आहे.
कॅप्टन टॉम यांना त्यांच्या १००व्या वाढदिवसाच्या दिवशी कर्नल ही मानद उपाधी दिली आहे. आता ते कर्नल टॉम मूर (Tom Moore) बनले आहेत. ३० एप्रिलला टॉम यांनी आपल्या वयाची १०० वर्षे पूर्ण केेली आहेत. मागील महिन्यात टॉमने आपल्या घरातील गार्डनमध्ये चालून कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेसाठी मदत म्हणून २९० कोटी रुपयांचा निधी जमा केला होता. त्यांनी त्यासाठी आव्हान केले होते.
What a privilege. Truly amazing to be made an Honorary Member of the England cricket team. Thank you @MichaelVaughan and @englandcricket for this very special honour 🏏#100NotOut https://t.co/9bVKTJHPz7
— Captain Sir Tom Moore (@captaintommoore) April 30, 2020
तरी त्यांचे लक्ष्य केवळ ९४ हजार रुपये जमा करण्याचे होते. परंतु टॉम यांची धाडस पाहून लोकांनी चांगले योगदान दिले.
यापूर्वी टॉम यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधताना इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) म्हणाला की, कॅप्टन टॉम हे देशाचा महत्त्वाचा भाग आहेत. आम्ही तुम्हाला इंग्लंड क्रिकेट संघाचा अधिकृत सदस्य बनवतो. टॉम यांनी आपल्या जॅकेट आणि मेडल्सबरोबर ‘समारंभात’ भाग घेतला आणि त्यांचा नातू बेंजी इंग्राम मूरने त्यांना इंग्लंड कसोटी संघाची कॅप सोपविली.”
A very happy 100th birthday @captaintommoore! 💯
You are a national treasure and an inspiration to all of us.#HappyBirthdayCaptainTom
🎥 @SkyCricket pic.twitter.com/jfbHFoCubI
— England Cricket (@englandcricket) April 30, 2020
वॉन पुढे म्हणाला की, “तुम्ही देशासाठी खूप काही केले आहे. तुम्ही राष्टीय आरोग्य सेवेसाठी खूप निधी जमा केला आहे. आम्ही तुम्हाला इंग्लंड क्रिकेट संघाचा मानद सदस्य बनवतो. तसेच फॉर्म्यूला वन संघ आणि ड्रायव्हर्सनेदेखील टॉम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. टॉम हे मॅकलेरन संघाचे मोठे चाहते आहेत.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-एकदा नाही, दोनदा नाही तर या ५ वेळा रोहितने गोलंदाजांना धु धु धुतले
-सामना झाल्यावर स्टंप गोळा करण्याचा छंद धोनीने का थांबवला???
-भारताच्या महान क्रिकेटपटूचा लाॅकडाऊन दरम्यान मृत्यु