डब्लिन। 27 जूनला भारत विरुद्ध आयर्लंड यांच्याच पार पडलेल्या सामन्यात भारताने 76 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनने अर्धशतके झळकावत मोलाचा वाटा उचलला.
याबरोबरच रोहित शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित 10,000 धावा पूर्ण करण्याचा मोठा टप्पा गाठला. हा टप्पा पार करणारा तो भारताचा 13 वा क्रिकेटपटू आहे.
त्याने आयर्लंड विरुद्ध 61 चेंडूत 97 धावांची खेळी केली. त्याचे टी20तील तिसरे शतक थोडक्यात हुकले. त्याच्या या खेळीत रोहितने 8 चौकार आणि 5 षटकार मारले. यामुळे आता त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40.73 च्या सरासरीने 10,022 धावा झाल्या आहेत. यात त्याच्या 22 शतके आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आत्तापर्यंत 25 कसोटी सामने खेळले असुन त्याने यात 3 शतके आणि 9 अर्धशतकांसह 39.97च्या सरासरीने 1479 धावा केल्या आहेत. तसेच 180 वनडे सामन्यात 44.55 च्या सरासरीने 6594 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 द्विशतकांचाही समावेश आहे.
याबरोबरच रोहित भारताकडून सर्वाधिक टी20 सामने खेळणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने 80 टी20 सामने खेळताना 31.95 च्या सरासरीने 1949 धावा केल्या आहेत. भारताकडून पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्यातही रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–टी२०मध्ये ६ हजार धावा करणारा शिखर धवन ६वा भारतीय
–माजी कॅप्टन कूल एमएस धोनीसाठी आजचा दिवस खास