पुणे । ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दहाव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात सुशांत दबस, मोहित बेंद्रे, आर्यन भाटिया, डेनिम यादव तर मुलींच्या गटात आकांक्षा नित्तुरे, सुदिप्ता कुमार, गार्गी पवार व बेला ताम्हणकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरात प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या एकेरी गटात हरियाणाच्या अव्वल मानांकीत सुशांत दबसने आसामच्या सहाव्या मानांकीत उदित गोगोईचा 6-4, 6-4 असा, मध्यप्रदेशच्या दुस-या मानांकीत डेनिम यादवने दिल्लीच्या कार्तिक सक्सेनाचा 6-3, 6-2 असा तर महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत आर्यन भाटियाने महाराष्ट्राच्या प्रणित कुदळेचा 6-2, 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात महाराष्ट्रच्या बिगर मानांकीत आकांक्षा नित्तुरेने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत तेलंगणाच्या पाचव्या मानांकीत पावनी पाठकचा 6-1, 6-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरात धडक मारली. महाराष्ट्राच्या मानांकीत खेळाडूंनी आपल्या लैकीकाला साजेशी खेळी करत उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राच्या अव्वल मानांकीत सुदिप्ता कुमारने तेलंगणाच्या चरिथा पटलोल्लाचा 6-2, 6-0 असा, महाराष्ट्रच्या चौथ्या मानांकीत गार्गी पवारने गुजरातच्या माही पांचालचा 6-1, 6-2 असा तर महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत बेला ताम्हणकरने कर्नाटकच्या गायत्री बालाचा 6-7(2), 7-5, 6-3 असा टायब्रेकरमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
मुलांच्या दुहेरी गटात आर्यन भाटिया व डेनिम यादव यांनी मोहित बोन्द्रे व भृगेन बोन्द्रे यांचा 7-5, 6-1 असा तर राजेश कन्नन व उदित कंभोज यांनी अमन तेजाबवाला व शशांक नरडे यांचा 7-6(3), 6-1 असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. सुशांत दबस व उदित गोगोई यांनी गिरीश चौगुले व सर्वेश बिरमाने यांचा 6-2, 6-3 असा तर आदित्य बलसेकर व कार्तिक सक्सेना या जोडीने धान्या शहा व हिरक वोरा यांचा 6-4, 6-2 असा पराभव केला.
मुलींच्या दुहेरी गटात गार्गी पवार व बेला ताम्हणकर या जोडीने आर्या पाटील व इला दाढे यांचा 6-3, 6-2 असा तर पवनी पाठक व आईरा सूद यांनी चरिता पटलोला व प्रियांशी शर्मा यांचा 6-0, 5-7, 10-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. सुदिप्ता कुमार व आकांक्षा नित्तुरे यांनी दिविजा गोडसे व स्नेहा रानडे यांचा 6-0, 6-2 असा तर साई दिया बालाजी व प्राची बजाज यांनी राधिका परब व कामया परब यांचा 6-2, 1-6, 10-5 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:उपांत्यपुर्व फेरी: मुले:
सुशांत दबस(हरियाणा)(1)वि.वि. उदित गोगोई(आसाम)(6) 6-4, 6-4;
मोहित बेंद्रे(गुजरात)वि.वि. सुहित लंका(तेलंगणा) 6-4, 4-6, 7-6(4);
आर्यन भाटिया(महा)(4)वि.वि. प्रणित कुदळे(महा) 6-2, 6-1;
डेनिम यादव(मध्यप्रदेश)(2)वि.वि. कार्तिक सक्सेना(दिल्ली)6-3, 6-2
उपांत्यपुर्व फेरी: मुली:
आकांक्षा नित्तुरे(महाराष्ट्र) वि.वि पावनी पाठक(तेलंगणा)(5) 6-1, 6-0;
सुदिप्ता कुमार(महाराष्ट्र)(1) वि.वि चरिथा पटलोल्ला(तेलंगणा) 6-2, 6-0;
गार्गी पवार(महाराष्ट्र)(4) वि.वि माही पांचाल(गुजरात) 6-1, 6-2;
बेला ताम्हणकर(महाराष्ट्र)(2) वि.वि गायत्री बाला(कर्नाटक) 6-7(2), 7-5, 6-3;
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
आर्यन भाटिया/डेनिम यादव वि.वि.मोहित बोन्द्रे/भृगेन बोन्द्रे 7-5, 6-1;
राजेश कन्नन/उदित कंभोज वि.वि.अमन तेजाबवाला/शशांक नरडे 7-6(3), 6-1;
सुशांत दबस/उदित गोगोई वि.वि.गिरीश चौगुले/सर्वेश बिरमाने 6-2, 6-3;
आदित्य बलसेकर/कार्तिक सक्सेना वि.वि धान्या शहा/हिरक वोरा 6-4, 6-2;
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुली:
गार्गी पवार/बेला ताम्हणकर वि.वि.आर्या पाटील/इला दाढे 6-3, 6-2;
पवनी पाठक/आईरा सूद वि.वि.चरिता पटलोला/प्रियांशी शर्मा 6-0, 5-7, 10-1
सुदिप्ता कुमार/आकांक्षा नित्तुरे वि.वि दिविजा गोडसे/स्नेहा रानडे 6-0, 6-2;
साई दिया बालाजी/प्राची बजाज वि.वि राधिका परब/कामया परब 6-2, 1-6, 10-5;
महत्त्वाच्या बातम्या:
–आज कॅप्टन कूल धोनी खेळतोय शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना !
–गतविजेते मुंबई उपनगर व पुणे संघाची विजयी सलामी, जाणून घ्या पहिल्या दिवसाचे निकाल
–ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय
–भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा