क्रिकेटटॉप बातम्या

“गौतम गंभीरने नाही तर मी सुनील नारायणला आणले”, केकेआरच्या माजी फलंदाजाचा मोठा दावा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा माजी फलंदाज मनोज तिवारी सध्या चर्चेत आहे. मनोजने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल काही विधाने केली आहेत. ज्यामुळे त्याच्यावर टीका होत आहेत. गंभीरला पाठिंबा देताना अनेक सध्याच्या क्रिकेटपटूंनी मनोजवर निशाणा साधला आहे. पण मनोज अजूनही थांबण्यास तयार नाही. मनोजने दुसऱ्या एका मुलाखतीदरम्यान पुन्हा गंभीरवर निशाणा साधला आणि सुनील नारायणला केकेआर संघात आणण्यात गंभीरपेक्षा त्याची मोठी भूमिका असल्याचा दावाही केला.

गंभीरला अनेकदा असे म्हणताना पाहिले आणि ऐकले गेले आहे की त्याने केकेआर व्यवस्थापनाला सुनील नारायणला खरेदी करण्यास स्पष्टपणे सांगितले होते.

न्यूज 24 शी बोलताना मनोज म्हणाला, “माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द सात वर्षांची होती, ज्यामध्ये मी सातत्याने खेळू शकलो नाही. मात्र, जेव्हा जेव्हा मी संघात असेन तेव्हा मी बाहेरूनही गोष्टींचे निरीक्षण करायचो. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यादरम्यान कटक सामन्यात रोहित शर्माला नारायणने क्लीन बोल्ड केले. त्यावेळी मला समजले की जर रोहित या गोलंदाजाला खेळू शकत नसेल तर, त्यात काही तरी वैशिष्ट्य आहे, म्हणून मला नारायणला केकेआर मध्ये घेणे फायद्याचे वाटले, यानंतर, मी गौतमला नारायणला संघात घेण्यास सांगितले होते.

याशिवाय, मनोजने भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफच्या निवडीबाबत गौतमने केलेल्या टिप्पणीवरही त्यांना घेरले. भारताचा मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी गंभीर परदेशी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा विरोध करायचा. त्याला वाटत होते की तो फक्त पैसे कमवण्यासाठी भारतात येतात. मात्र, आता खुद्द गंभीरसोबत दोन परदेशी सपोर्ट स्टाफ काम करत आहेत.

यावर मनोज म्हणाला, “गंभीर हा एक मोठा ढोंगीमाणूस आहे. जेव्हा भारताच्या सपोर्ट स्टाफची निवड होणार होती, तेव्हा त्याने मोर्केल आणि रायन टेन डोशेटला का आणले? मोर्केल त्याच्यासोबत लखनऊमध्ये होता, म्हणून त्याने त्याला आणले. तर मग अश्यावेळी गंभीरने भारतीय प्रशिक्षकांची नावे का पुढे केली नाहीत?” असा ही तो प्रश्न उपस्थितीत केला.

हेही वाचा-

Champions Trophy 2025; दुबईमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा? पाहा एका क्लिकवर
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सूर्यकुमार यादवला संधी का मिळावी? जाणून घ्या मोठी कारणे
SA20: 28 वर्षीय खेळाडूचा पहिल्याच सामन्यात जलवा, मलिंगा-बुमराच्या खास क्लबमध्ये प्रवेश

Related Articles