पुणे। प्रतीक मुळ्ये याने ७ गुणांसह विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट, हिंद शक्ती सोशल फाउंडेशन आणि जयंत गोखले चेस इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित कै. प्रल्हाद सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ झालेल्या दहाव्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटाचे विजेतेपद पटकावले.
ही स्पर्धा भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळ येथे २६ जानेवारी रोजी झाली. आठव्या व अखेरच्या फेरीत पहिल्या पटावर प्रतीकने रणवीर मोहितेवर मात केली. दुस-या पटावर केवल निर्गुणला चित्तारी वर्माकडून पराभव पत्करावा लागला. यासह प्रतीकचे सात गुणांसह विजेतेपद निश्चित झाले. या आठ फे-यांमध्ये प्रतीकला केवळ एकच पराभव पत्करावा लागला. पाचव्या डावात राहुल वर्मा याने त्याला नमविले. चित्तारी वर्मा (६.५) दुस-या, रवी बेहेरे (६.५) तिस-या स्थानावर राहिला. राहुल वर्मा (६) चौथ्या, तर रणवीर मोहिते (६) पाचव्या स्थानावर राहिला.
स्पर्धेतील प्रौढ गटात लक्ष्मण खुडे (४.५), महिलांमध्ये रिया मराठे (५), १६ वर्षांखालील गटात केवल निर्गुण (६), १२ वर्षांखालील गटात अर्णव नानल (५.५), ८ वर्षांखालील गटात अलौकिक सिन्हा (४) यांना गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली. पारितोषिक वितरणप्रसंगी नगरसेवक मुरलीधर मोहोळ, सिनेअभिनेते रमेश परदेशी, महाराष्ट्रीय मंडळाचे धनंजय दामले, अभिजीत मोडक, सुनील पांडे, भूषण मोरे आदी उपस्थित होते. ॠषिकेश आर्य, समीर हळंदे यांनी स्पर्धेचे आयोजन केले. जोसेफ डिसोझा आणि जयंत गोखले यांनी मार्गदर्शन केले. राजेंद्र शिदोरे यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले.
आठव्या व अखेरच्या फेरीचे निकाल – प्रतीक मुळ्ये (७) वि. वि. रणवीर मोहिते (६), चित्तारी वर्मा (६.५) वि. वि. केवल निर्गुण (६), अर्णव नानल (५.५) पराभूत वि. रवी बेहेरे (६.५), मयुर मोघे (५) पराभूत वि. राहुल वर्मा (६), शिवम पांचाळ (६) वि. वि. ओम लामकाणे (५), नागनाथ हलकुडे (६) वि. वि. लक्ष्मण खुडे (४.५), उदय मुद्रा (५) बरोबरी वि. अमित धुमाळ (५), राहुल मोघे (५.५) वि. वि. सर्वेश सावंत (४.५), श्रेयस हापसे (५) वि. वि. अशिका काळे (४.५), ओंकार मराठे (५) वि. वि. कपलि इकुर्ला (४).
(फायनल स्टँडिंग) खुला गट – प्रतीक मुळ्ये (७), चित्तारी वर्मा (६.५), रवी बेहेरे (६.५), राहुल वर्मा (६), रणवीर मोहिते (६), शिवम पांचाळ (६), नागनाथ हलकुडे (६), राहुल मोघे (५.५), ओम लामकाने (५), अमित धुमाळ (५).
१६ वर्षांखालील गट – केवल निर्गुण (६), धैवत आपटे (५), अथर्व शितोळे (५), अक्षय साठ्ये (४.५), सर्वेश सावंत (४.५), यशवर्धन अगरवाल (३.५), श्रेयस पाटील (३).
१२ वर्षांखालील गट – अर्णव नानल (५.५), प्रणव भोगावत (५), आरव शाह (५), श्रावणी उंडाळे (५), अशिका काळे (४.५), हितांश जैन (४.५), सुयोग वडके (४), निहार चव्हाण (४), तन्वी कुलकर्णी (४), धनश्री खैरमोडे (३.५).
८ वर्षांखालील गट – सिन्हा अलौकिक (४), वरद नांदुरडिकर (४), रोहिन लागू (४), भुवन शितोळे (४), अरिन कुलकर्णी (४), कोमल गोरे (३), ओजस पाटील (३).