---Advertisement---

अमेरिकन टी२० लीगमध्ये खेळणार जगातील सगळ्यात वजनदार क्रिकेटपटू, ११ भारतीय खेळाडूही होणार सहभागी

On: शनिवार, जून 12, 2021 10:08 PM
Cricket Ground
---Advertisement---

साल २००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा पहिला हंगाम आयोजित केला गेला होता. दिवसेंदिवस या टी२० लीगच्या लोकप्रियतेत वाढच होत गेली. आजही आयपीएलला जगातील एक सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय टी२० मानले जाते. आयपीएलच्या यशानंतर तशाच स्वरूपाच्या अनेक टी२० लीग जगभरात सुरू झाल्या.

आता तर चक्क क्रिकेट जिथे फारसे परिचित नव्हते अशा अमेरिकेत देखील टी२० लीगची सुरुवात होते आहे. येत्या ३१ जुलै पासून अमेरिकेत ही टी२० लीग सुरू होते आहे. जगभरातील जवळपास ८० प्रथम श्रेणी दर्जाचे खेळाडू या लीगमध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे यात ११ भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.

सगळ्यात वजनदार खेळाडू देखील होणार सामील
या टी२० लीगमध्ये एक आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील सहभागी होणार आहे. जो जगातील सगळ्यात वजनदार क्रिकेटपटू देखील प्रसिद्ध आहे. हा खेळाडू म्हणजे वेस्ट इंडिजचा रहकीम कॉर्नवॉल. १४० किलो वजनाच्या कॉर्नवॉलला देखील एका संघात स्थान मिळाले आहे.

या व्यतिरिक्त अजुनही काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या लीगमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. यात न्यूझीलंडचा कोरी अँडरसन, दक्षिण आफ्रिकेचा डेन पिट, पाकिस्तानचा शमी असमल, हमाद आझम इत्यादींचा समावेश आहे. वेस्ट इंडिजचा ४२ वर्षीय क्रिकेटपटू रिकार्डो पॉवेल देखील यात सामील होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा व्हिसा निश्चित न झाल्याने त्यांच्या सहभागाबाबत घोषणा करण्याचे टाळण्यात आले आहे.

भारताचे खेळाडू होणार सामील
या लीगमध्ये सामील होणार्‍या खेळाडूंमध्ये भारताच्या तब्बल ११ खेळाडूंचा समावेश आहे. भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य समित पटेल या लीगमध्ये खेळणार आहे. त्याला बीसीसीआय तर्फे अनुमती देण्यात आली आहे. याशिवाय आयपीएल मध्ये दिल्ली आणि बंगलोरच्या संघाकडून खेळलेला मिलिंद कुमार आणि गुजरातचा माजी वेगवान गोलंदाज सिद्धार्थ त्रिवेदी देखील या टी२० लीगमध्ये खेळतांना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

तब्बल १०१ च्या सरासरीने धावा फटकावणारा WTC Final मध्ये ठरू शकतो भारतासाठी डोकेदुखी

भारतीय संघ खेळतोय आपापसात सराव सामना, पहिल्या दिवशी ‘या’ खेळाडूंनी दाखवली चमक

व्हिडिओ: WTC फायनलसाठी कोहलीची ‘विराट’ तयारी, ‘या’ फटक्यांचा करतोय खास सराव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---