वर्षभरात अनेक देशांमध्ये तुफानी सामने पाहायला मिळतात. यातील काही सामने असे असतात जे पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आसुसलेले असतात. त्यातील बहुचर्चित सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. हे दोन संघ जेव्हा आपापसात भिडतात तेव्हा मैदानावर आणि मैदानाबाहेर एखाद्या लढाईसारखे वातावरण असते. ज्याच्यामुळे हा सामना अधिक रोमांचित झाल्यासारखा वाटतो. त्यामुळेच या सामन्याची तिकीट विक्री वेगाने होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
बर्मिंगहॅम येथे २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सची १२ लाख तिकिटे विकली गेली आहेत आणि आयोजकांचे म्हणणे आहे की स्थानिक लोक भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघांमधील सामन्यात खूप रस घेत आहेत. महिला क्रिकेट राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणार असून भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३१ जुलै रोजी सामना होणार आहे.
बर्मिंगहॅममध्ये भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे अनेक लोक राहतात. बर्मिंगहॅम गेम्सचे सीईओ इयान रीड यांनी पीटीआयला सांगितले की, “उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीची तिकिटे विकली गेली आहेत आणि भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यासाठीही स्टेडियम खचाखच भरले जाईल अशी अपेक्षा आहे.”
ते म्हणाले की, “मी स्वतः क्रिकेटचा चाहता आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्यामुळे इथल्या लोकांना त्या सामन्याबद्दल खूप उत्सुकता आहे. भारतीय पुरुष संघ नुकताच येथे खेळण्यासाठी गेला असून आता हा सामना आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे.
ते म्हणाले की, “उपांत्य आणि अंतिम फेरीची तिकिटे विकली गेली आहेत. त्यात भारत आणि इंग्लंड खेळतील अशी आशा आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यांची तिकिटेही जवळपास विकली गेली आहेत.” लंडन ऑलिम्पिक २०१२ नंतर इंग्लंडमधील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत ७२ कॉमनवेल्थ देशांतील ५००० हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.”
दरम्यान, या सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. क्रिकेटमध्ये अगदी कमीवेळला भारत आणि पाकिस्तानचा संघ भिडताना पाहायला मिळतो. त्यामुळेेच प्रत्येक वेळेस हा सामना पाहण्यासाठी लोकांची गर्दी दिसून येते. अशीच गर्दी यावेळीही दिसेल अशी अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत धवन- राहुलच्या जोडीसमोर ४ मोठे सवाल, असा काढू शकतात मार्ग
लॉर्ड्सवर पुजाराची कॅप्टन्स इनिंग! ठोकले नाबाद शतक; वॉशिंग्टनचे ‘सुंदर’ पदार्पण
अखेरच्या वनडेत उतरताच स्टोक्सच्या डोळ्यात तरळले अश्रू! पाहा भावूक करणारा व्हिडिओ