पुणे, 14 डिसेंबर 2022: स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजेंटमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या स्पोर्ट्सफिल्ड करंडक 12 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत पुणे व पिंपरी चिंचवड भागांतील निमंत्रित 12 संघ सहभागी झाले आहेत. हि स्पर्धा दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी खेल क्रिकेट अकादमी मैदानावर 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
स्पर्धेत आर्यन्स क्रिकेट अकादमी, सनराईज क्रिकेट स्कुल, एसए- आरके क्रिकेट अकादमी, रायझिंग स्टार्स क्रिकेट अकादमी, खेल क्रिकेट अकादमी, स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अकादमी, हजारे स्पोर्टस् क्लब, विराग क्रिकेट अकादमी, 22 यार्डस क्रिकेट अकादमी, यश क्रिकेट अकादमी, साई एमजे स्पोर्टस् अकादमी, प्राधिकरण जिमखाना हे 12 संघ झुंजणार आहेत.
स्पर्धेतील संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे सामने 25षटकांचे होणार असून अंतिम सामना 30षटकांचा खेळविला जाणार आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना 17 डिसेंबर 2022 रोजी, तर अंतिम फेरीचा सामना 5 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघाला करंडक, पदक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर यांना आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजेंटमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सनी मारवाडी यांनी दिली. (12 teams participated in the 2nd Sportsfield Cup Under 12 Interclub Cricket Tournament)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आंतर-जिल्हा फुटबॉल | नाशिक, नांदेड, औरंगाबादचा विजय
पुजारा-अय्यरच्या भागीदारीमुळे भारत सुस्थितीत! पहिल्या दिवशी संघाची धावसंख्या 250 पार