बर्मिंगहॅम। आज(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना पार पडणार आहे. एजबस्टर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात आज 11 जणांच्या भारतीय संघात केदार जाधव ऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. सप्टेंबर 2004मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या दिनेशचा हा विश्वचषकातील पहिलाच सामना आहे.
या विश्वचषकाआधी 12 वर्षांपूर्वी 2007 च्या विश्वचषकामध्ये दिनेशला भारतीय संघात संधी मिळाली होती. परंतू2007 च्या विश्वचषकात भारताच्या तीनही सामन्यात एमएस धोनीला यष्टीरक्षक म्हणून अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली होती. त्यामुळे कार्तिकला तीनही सामन्यात बाहेर बसावे लागले होते.
आता अखेर 12 वर्षांनंतर दिनेश कार्तिक विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यास सज्ज झाला आहे.
विशेष म्हणजे 2007 च्या विश्वचषकात भारतीय संघात समावेश असलेले दिनेश आणि धोनी हे दोनच खेळाडू 2019 च्या विश्वचषकासाठीही भारतीय संघात असणार आहेत. पण आज पहिल्यांदाच विश्वचषकात त्यांना एकत्र खेळण्याची संधी मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–बांगलादेश विरुद्ध केदार जाधवला वगळले, त्याच्याऐवजी हा खेळाडू करतोय विश्वषकात पदार्पण
–टॉप ५: भारत-बांगलादेश संघात होणाऱ्या सामन्यात हे खास ५ विक्रम करण्याची भारतीय खेळाडूंना संधी






