---Advertisement---

जगातील सर्वात जलद कसोटी सामना! एकाच दिवसात पडल्या 27 विकेट्स, 137 वर्षांचा रेकाॅर्ड आजही कायम!

On: मंगळवार, जुलै 15, 2025 4:28 PM
Lord's Cricket Ground
---Advertisement---

Most Wicket In Single Day Of Test History: आजपासून 137 वर्षांपूर्वी, 1888 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने मिळून असा एक रेकाॅर्ड केला, जो आजपर्यंत मोडता आलेला नाही. दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिका सुरू होती आणि ऑस्ट्रेलिया इंग्लंड दौऱ्यावर होता. हा सामना लॉर्ड्सवर खेळला जात होता. पहिल्या दिवशी 13 विकेट्स पडल्या. ऑस्ट्रेलिया ऑलआउट झाला, तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनेही 3 विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर दुसऱ्या दिवशी जे घडले, तो इतिहास बनला. (Test Cricket Record)

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील हा ऐतिहासिक सामना 1888 साली खेळला गेला होता, जेव्हा ऑस्ट्रेलिया 3 सामन्यांच्या ऍशेस मालिकेसाठी इंग्लंडला गेला होता. दोन्ही संघांमधील हा सामना अवघ्या 2 दिवसातच संपला. दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी एवढी भेदक गोलंदाजी केली की, कोणताही फलंदाज जास्त धावा करू शकला नाही. (Most Wickets in a Day Test)

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात सामन्याच्या पहिल्या दिवशीच केवळ 116 धावांवर ऑलआउट झाला. इंग्लंडसाठी बॉबी पीलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. पहिल्याच दिवशी इंग्लंडची फलंदाजी आली, पण त्यांचे फलंदाजही फार काही करू शकले नाहीत. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने केवळ 18 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. (Australia England Ashes 1888)

मग आला सामन्याचा दुसरा दिवस, जो इतिहास बनला. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव फक्त 53 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज चार्ली टर्नरने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 60 धावांवर संपला. इंग्लंडसमोर 124 धावांचे लक्ष्य होते, पण इंग्लंडचा संपूर्ण संघ 62 धावांवरच गारद झाला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने अवघ्या 2 दिवसात 61 धावांनी हा ऐतिहासिक सामना जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---