---Advertisement---

अजूनही निवृत्त झाला नाही २००३ क्रिकेट विश्वचषकातील ‘हा’ हिरो, इतर सर्वांनी सोडले क्रिकेट

---Advertisement---

२००३ विश्वचषकातील आठवणी सर्वच भारतीय क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने थेट अंतिम सामन्या पर्यंत मजल मारली होती. अंतिम सामन्यात जरी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव पत्करावा लागला असला तरी, आपल्या खेळाने भारतीय संघाने सर्वच क्रिकेट रसिकांची वाहवा मिळविली होती. या संघातील यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने बुधवारी ( दि. ९ डिसेंबर) निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता केवळ एकच खेळाडू असा राहिला आहे ज्याने अजूनही निवृत्ती घेतलेली नाही. मात्र या दिग्गज फिरकीपटूचे भारतीय संघातील पुनरागमन जवळ- जवळ अशक्य वाटत आहे.

१५ खेळाडूंपैकी १२ जणांना मिळाली होती प्रत्यक्ष संधी-

२००३ विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेला गेलेल्या भारतीय संघात १५ खेळाडूंना स्थान देण्यात आले होते. त्यात सौरव गांगुली (कर्णधार), राहुल द्रविड, सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, दिनेश मोंगिया, पार्थिव पटेल, संजय बांगर, अनिल कुंबळे, झहिर खान, जवागल श्रीनाथ, अशिष नेहरा. अजित आगरकर व हरभजन सिंग या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. यातील संजय बांगर, अजित आगरकर व पार्थिव पटेल या तीन खेळाडूंना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतू या १५ खेळाडूंपैकी आता १४ खेळाडू निवृत्त झाले असून हरभजन सिंग हा एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने अजून निवृत्तीची घोषणा केली नाही. २००३ विश्वचषकात टीम इंडियाने खेळलेल्या ११ पैकी १० सामन्यात हरभजनला संधी देण्यात आली होती. यापुर्वी नोव्हेंबर २०१९मध्ये दिनेश मोंगियाने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला होता.

२०१६ साली खेळला होता शेवटचा आतंरराष्ट्रीय सामना –
दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने आपला शेवटचा आतंरराष्ट्रीय सामना २०१६ साली आशिया कप टी२० स्पर्धेत युएई विरुद्ध खेळला होता. तसेच,हरभजनने २०१५ मध्ये आपला शेवटचा एकदिवसीय व कसोटी सामना खेळला होता. आपल्या कारकिर्दित हरभजनने १०३ कसोटी सामन्यांत ४१७ व २३६ एकदिवसीय सामन्यांत २६९ विकेट मिळवल्या आहेत. तसेच त्याने भारताकडून २९ टी२० सामने देखील खेळले आहेत, ज्यात त्याने २५ बळी मिळवले आहेत.

२००० सालापुर्वी पदार्पण केलेला व निवृत्ती न घेतलेला एकमेव भारतीय क्रिकेटपटू

२००० सालापुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या खेळाडूंमध्ये सध्या केवळ ख्रिस गेल, शोएब मलिक व हरभजन सिंग या तीनच खेळाडूंनी निवृत्ती घेतलेली नाही. मलिकने २०१५मध्ये कसोटी व २०१९मध्ये वनडे कारकिर्दीला अलविदा केला आहे. परंतू हा ३८ वर्षीय खेळाडू अजूनही टी२० संघात स्थान मिळण्याची वाट पाहात आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर २०२०मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला आहे. ख्रिस गेलने आयपीएल २०२०वेळी निवृत्तीबद्दल उठत असलेल्या वावड्यांना पुर्णविराम दिला असून आपण निवृत्त न झाल्याचे सांगितले आहे. ऑगस्ट २०१९मध्ये गेल शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. गेल व मलिकने आंतरराष्ट्रीय पदार्पण १९९९साली केले होते. तर हरभजनचे आंतरराष्ट्रीय पदार्पण १९९८ साली झाले होते.

आयपीएल २०२० मधून घेतली होती माघार –
यूएईत झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेतून हरभजनने माघार घेतली होती. तेव्हापासूनच त्याच्या निवृत्ती बद्दल क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र हरभजनने अजूनपर्यंत निवृत्तीची घोषणा केलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 
अन् क्रिकेटला सर्वस्व मानलेल्या पार्थिवची बारावीची परिक्षा हुकली…
…जो काही आहे ते या दोन कर्णधारांमुळेच, पार्थिव पटेलनं सांगितली आवडत्या सनसेनापतींची नावं
या गोष्टीचा विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडताना विचार केला जाणार नाही!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---