भारतीय अंडर-19 संघ आपल्या नवीन वर्षाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपासून करत आहे (IND vs SA). या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. या मालिकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे (Vaibhav Suryavanshi) भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा वैभव आता नेतृत्व सांभाळण्यामध्ये कशी कमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2026 मध्ये होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
3 जानेवारी, विलोमूर पार्क, बेनोनी येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर, टॉस 1:00 वाजता होणार आहे.
सामन्याच थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) वर होणार आहे. तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार (JioHotstar) ॲपवर होईल.
भारतीय अंडर-19 संघ:
वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज, हरवंश पंगालिया, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टिरक्षक), कनिष्क चौहान, आरएस अंबरीश, खिलान पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंह, मोहम्मद एनान, राहुल कुमार, उधव मोहन, युवराज गोहिल.
दक्षिण आफ्रिका अंडर-19 संघ:
मुहम्मद बुलबुलिया (कर्णधार/यष्टिरक्षक), जोरिच वान शल्कविक, अदनान लागाडियन, जेसन राउल्स, अरमान मनैक, पॉल जेम्स, डेनियल बोसमैन, बैंडिले मबाथा, एनटांडो सोनी, जे जे बैसन, बयांदा माजोला, कॉर्न बोथा, माइकल क्रुइस्कैंप, लेथाबो फाहलामोहलाका, एनाथी किट्सिनी.






