Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्या मौसमासाठी एकूण १४३ खेळाडूंची निवड

अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्या मौसमासाठी एकूण १४३ खेळाडूंची निवड

July 15, 2022
in अन्य खेळ, टॉप बातम्या

पुणे– खो खो हा अस्सल देशी खेळ आता नव्या रूपात अवतरणार असून पुण्यात होणार्‍या अल्टिमेट खो खो -2022 स्पर्धेच्या पहिल्यावहिल्या मौसमासाठी सहा फ्रँचाइजींच्या वतीने गुरुवारी झालेल्या चाचणीतून एकूण 143 खेळाडूंची निवड करण्यात आली.

डाबर इंडिया समूहाचे अध्यक्ष अमित बर्मन आणि भारतीय खो खो महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या या स्पर्धेला पुण्यात येत्या 14 ऑगस्ट रोजी प्रारंभ होत असून सहा संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा येत्या 14 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान बालेवाडी स्टेडियम येथे होणार आहे.

एकूण 28 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 240 खेळाडूंमधून अ, ब, क व ड अशा चार गटांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी आणि अन्य अहवालांच्या निकषावर सहा फ्रँचाइजींनी 143 खेळाडूंची निवड केली. खो खोचा हा नवा अवतार प्रेक्षकांना निश्‍चितच आवडेल.

अ गटासाठी 77 खेळाडूंमधून निवड करण्यात आलेल्या 20 खेळाडूंमध्ये दक्षिण आशियाई सुवर्ण पदकविजेता प्रतीक वायकर (तेलुगू योद्धाज), आंध्रचा पोथिरेड्डी सिवारेड्डी (गुजरात), तमिळनाडूचा एम विग्नेश (चेन्नई क्विक गन्स) व कर्नाटकचा एमके गौतम (ओडिश जगरनॉटस) यांचा समावेश आहे. अ गटाच्या खेळाडूंना प्रत्येकी पाच लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे.

अल्टिमेट खो खोचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेन्झिंग नियोगी म्हणाले, की स्पर्धेतील खेळाडूंची निवड अखेर यशस्वीपणे पार पडली आहे. भारतीय क्रीडाक्षेत्रात क्रांती घडविणार्‍या नव्या खो खो लीगचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे.

ते पुणे म्हणाले की, आता सर्व फ्रँचाइजी आपापल्या संघांच्या सराव शिबिराकडे 1 ऑगस्टपर्यंत लक्ष देऊ शकतील. खो खो या खेळाचे उत्तम मार्केटिंग करून तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हेच आमचे लक्ष्य आहे.

महाराष्ट्राचा महेश शिंदे (चेन्नई)े हा खरेदी केलेला या स्पर्धेतील पहिला खेळाडू ठरला. चेन्नई क्विक गन्सचे सहमालक श्रीनाथ चित्तुरी म्हणाले, की आम्ही अत्यंत समतोल असा संघ निवडला असून त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही सराव सामन्यांनंतर आम्हाला खेळाडूंच्या कौशल्याचा अंदाज येईल.
मुंमबई खिलाडीजचे सहमालक पुनीत बालन म्हणाले, की आम्ही काही डावपेच आखले आहेत. परंतु आमचे अ, ब व क असे प्लॅन आहेत. आम्हाला काही खेळाडू खरेदी करायचे होते. परंतु आता 24 खेळाडूंचा आमचा संघ उत्तम असल्याचे माझे मत आहे. खेळ खिला देंगे या आमच्या घोषवाक्याप्रमाणेच आम्ही सर्वोत्तम कामगिरी करून अव्वल स्थान मिळवू.

तेलुगू योद्धाजचे सहमालक कर्नल विनोद बिश्त म्हमाले, की पहिल्याच मोसमात आमची भिस्त प्रशिक्षकांवर आहे. त्यांच्या अहवालानुनासरच आम्ही संघनिवड केली आहे. या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे उत्तम मिश्रण आहे. त्यामुळे पहिल्या मोसमात आम्ही चांगली कामगिरी करू असा मला विश्‍वास आहे.

राजस्थान वॉरिअर्सचे सहमालक अजित शरण म्हणाले, की आम्ही निवडलेल्या खेळाडूंवर समाधानी आहोत. या संघात अनुभवी खेळाडूंवर भर असून कोणत्याही संघाला कडवी झुंज देण्याची त्यांची क्षमता आहे. पहिल्या मोसमासाठी आम्ही उत्सुक आहोत.

ओडिशा क्रीडाविभागाच्या लिलन प्रसाद साहू यांनी सांगितले, की आमच्या युवा खेळाडूंसाठी ही उत्तम संदी आहे. आता ओडिशा शासनाच्याच मालकीची ही फ्रँचाइजी असल्यामुळे खो खो खेळाला जास्तीत जास्त पुरस्कृत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या यादीपैकी 80 टक्के खेळाडू आम्हाला मिळाले असल्यामुळे आम्ही समाधानी आहोत.
गुजरात जायन्ट्सचे मालक अदानी स्पोर्टसलाईनचे सत्यम त्रिवेदी म्हणाले, की या नव्या खो खो लीगमद्ये सहभागी होण्यास आम्ही उत्सुक आहोत. भारतीय मातीतील या खेळासाठी आम्ही योगदान देऊ इच्छितो. प्रशिक्षकांचे प्रयत्न आणि खेळाडूंचा प्रतिसाद यावर बरेच काही अवलंबून आहे. परंतु आम्हाला बहुतेक खेळाडू अपेक्षेप्रमाणेच निवडता आले आहेत. त्यामुळे आम्ही चांगल्या कामगिरीची अपेक्षा करीत आहोेत.

साखळी फेरीत दररोज दोन अशा 34 लढती होणार असून बाद फेरी प्ले ऑफ पद्धतीने रंगणार आहे. बाद फेरीत क्वालिफायर व एलिमिनेटर लढतींचा समावेश आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण रोज सायंकाळी सात वाजता सुरू होणार असून रात्री 10 पर्यंत चालणार आहे.

सोनी समूह या स्पर्धेचा माध्यम प्रायोजक असून हिंदी (सोनी टेन 3), इंग्रजी (सोनी टेन 1), तमिळ व तेलुगू (सोनी टेन 4) आणि सोनी लिव्ह या वाहिन्यांवरून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

संघांची व त्यांतील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:
चेन्नई क्विक गन्स: महेश शिंदे, राजवर्धन पाटील, एम विघ्नेश, रामजी कश्यप, पट्टा नरसया, एस संथरू, सिबिन एम, अमित पाटील, मनोज पाटील, दासरी राव, व्ही काबिलन, मदन, पी जय प्रसथ, पी आनंद कुमार, बुचननागरी राजू, विजय वेगड, सचिन गौर, प्रीतम चौगुले, बलवीर सिंग, कातला मोहन, वेनिगोपाल एस, नीलकांतम सुरेश, जसवंत सिंग, विघ्नेश एम.

तेलुगू योद्धा: प्रतीक वाईकर, रोहन शिंगाडे, सुदर्शन, अरुण एस ए, अरुण गुंकी, दीपक माधव, अवधूत पाटील, प्रज्वल केएच, प्रज्वल केएच, आदर्श मोहिते, प्रसाद रादये, सुब्रमणि वाय, अनुकुल सरकार, गावरा व्यंकटेश, सदानंद मिटेती, पी. हेमचंद्रन, ध्रुव, चनीश सी, आदित्य दास, रोकेसन सिंग, पिटू रेड्डी आणि बोज्जम रंजित

गुजरात दिग्गज : रंजन शेट्टी, पोथरेड्डी शिवरेड्डी, मरीप्पा, सुयश गरगटे, सागर पोतदार, टी जगन्नाथ दास, रुतिशभाई बर्डे, अभिनंदन पाटील, अक्षय भनगरे, सागर लेंगारे, मोनोज सरकार, धीरज भावे, एस कविन राज, विनायक पोकार्डे, गोविंद भट, चिनमोय नांदी, शुभम जांभळे, एस सरथकुमार, अजयकुमार मांद्रा, अनिकेत पोटे, नीलेश पाटील, सलीम खान, देबेंद्र नाथ आणि प्रफुल भनगे

ओडिशा जगरनॉट्स: गौथम एमके, दिलीप खांडवी, विशाल, जगन्नाथ मुर्मू, आदित्य कुदळे, नीलेश जाधव, सूरज लांडे, दीपेश मोरे, सुभासिस संत्रा, महेशा पी, अविनाश देसाई, लिपुन मुखी, दिनेश नाईक एस, अर्जुन सिंग, सुरेश कुमार, टी विनो कुमार, शिवकुमार सेन, मिलिंद चावरेकर, मनोज घोटेकर, दर्शनपू सतीश, गुरजिंदर सिंग, स्वयम सत्यप्रकाश आणि मुकेश प्रजापत

राजस्थान वॉरियर्स : अभिजित पाटील, दिलराजसिंग सेंगर, सुशांत हजारे, अक्षय गणपुले, हृषीकेश मुरचवडे, सौरभ आडवकर, सुरेश सावंत, मजहर जमादार, मोहम्मद तसीन, शैलेश संकपाल, गोविंद यादव, एसके मुर्था अली, भरत प्रधान, निखिल बी, यल्ला सतीश, जितीन बी, के धनंजय सिंग, अटला रेड्डी, तपन पाल, महेश एम, बिस्वजित दास, अश्वनी रंजन, मुकेश मौर्य आणि भुवनेश्वर साहू

मुंबई खिलाडीज: मिलिंद कुरपे, रोहन कोरे, विसाग एस, श्रीजेश एस, विजय हजारे, फैजलखान पठाण, अभिषेक पाथरोडे, गजानन शेंगल, दुर्वेश साळुंके, राजेश कुमार, रोहित वर्मा, अविक सिंघा, श्रीबिन केपी, सौरव कांडपाल, अभिषेक एमएस , बिचू एसएस, रजत मलिक, राहुल सावंत, हरीश मोहम्मद, देवेंद्र डागूर, गौरव, श्रीजीन जे आणि उमर राथेर

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

फक्त १७ वनडे सामन्यांचा अनुभव, तरीही इंग्लंडच्या पठ्ठ्याने भारताच्या ६ खेळाडूंना भरले ‘टोपली’त, वाचा सविस्तर

नाचा रे! लेकींसोबत पुन्हा थिरकला वॉर्नर, वरुण धवनच्या ‘नाच पंजाबन’ गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३-४ सामने खेळलेल्या हुड्डाची कोहलीसोबत बरोबरी योग्य नाही’, भारतीय दिग्गज भडकला


Next Post
Rohit-Sharma-Video

Video: भर मैदानात निखळला रोहित शर्माचा खांदा, पण त्यानंतर जे घडले ते अविश्वसनीय होते

Team India vs ENG

विराट, रोहित नाही तर 'हा' खेळाडू आहे 'भारताचा वनडे स्पेशालिस्ट'! वाचा दिग्गजाने कोणाचे घेतले नाव

Rishabh-Pant-Rohit-Sharma

लॉर्ड्स वनडेत 'हे' पाच जण ठरले विलन, भारताच्या लाजिरवाण्या पराभावासाठी आहेत कारणीभूत

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143