---Advertisement---

World Cupमध्ये सर्वाधिक Catch पकडण्याचा रेकॉर्ड ‘या’ दिग्गजाच्या नावे, विराटसाठी चालून आली सुवर्णसंधी

Catch
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला आता 15 दिवस राहिले आहेत. या स्पर्धेचा घाट 5 ऑक्टोबरपासून भारतात घातला जाणार आहे. एकूण 10 संघ क्रिकेटच्या महाकुंभमेळ्यासाठी सहभागी होणार आहेत. अशात वनडे विश्वचषकात घडलेले आतापर्यंतच्या विक्रम समोर येत आहेत. अशात आपण, विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. या विश्वचषकातील अनेक खेळाडूंकडे हा शानदार विक्रम मोडण्याची संधी आहे.

रिकी पाँटिंगच्या नावावर विक्रम
ऑस्ट्रेलियाला आपल्या नेतृत्वाखाली दोन वेळा वनडे विश्वचषक (ODI World Cup) जिंकून देणारा रिकी पाँटिंग (Ricky Ponting) वनडे विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक झेल (Most Catches In World Cup) घेणारा अव्वल खेळाडू आहे. त्याने 1996 ते 2011 दरम्यानच्या विश्वचषकातील 46 सामन्यांमध्ये सर्वाधिक 28 झेल टिपले आहेत. त्याच्या पाठोपाठ या यादीत इंग्लंडचा दिग्गज जो रूट (Joe Root) आहे. रूटने 2015 आणि 2019 या दोन विश्वचषकात 17 सामने खेळताना 20 झेल टिपले आहेत. अशात रूटकडे पाँटिंगचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या असून त्याने विश्वचषक स्पर्धेत 18 झेल टिपले आहेत. त्यानंतर ख्रिस गेल 17 झेलांसोबत चौथ्या स्थानी, तर न्यूझीलंडचा ख्रिस केर्न्स 16 झेलांसह पाचव्या स्थानी आहे.

एका विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडण्याच्या विक्रमात रूट आघाडीवर
जो रूट एकूण झेल पकडण्याच्या यादीत पाँटिंगच्या मागे असला, तरीही एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. रूटने 2019च्या विश्वचषकात सर्वाधिक 13 झेल पकडले होते. तसेच, रिकी पाँटिंग याने 2003च्या विश्वचषकात 11 झेल पकडले होते.

विराटकडे कुंबळेचा विक्रम मोडण्याची संधी
भारतीय खेळाडूंमध्ये विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम माजी फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या नावावर आहे. कुंबळेने 1996 ते 2007 दरम्यानच्या विश्वचषकातील 18 सामन्यात 14 झेल पकडले आहेत. तसेच, विराटने 2011 ते 2019 या विश्वचषकांदरम्यान 26 सामन्यात 14 झेलच पकडले आहेत. विराट वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत हा विक्रम आपल्या नावावर करत कुंबळेला मागे टाकू शकतो. विराटला फक्त एका झेलाची गरज आहे. यानंतर तो सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल ठरेल. (15 days to world cup 2023 australia former captain ricky ponting has taken the most catches in the odi wc know here)

हेही वाचाच-
शाहीन दुसऱ्यांदा बनला आफ्रिदीचा जावई, बाबरने कडकडीत मिठी मारून दिल्या शुभेच्छा- Video
रोहितने वनडे संघात अश्विनला का दिली जागा? भारतीय दिग्गजाने स्पष्टच सांगितलं; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---