---Advertisement---

शाहीन दुसऱ्यांदा बनला आफ्रिदीचा जावई, बाबरने कडकडीत मिठी मारून दिल्या शुभेच्छा- Video

Babar-Azma-And-Shaheen-Afridi
---Advertisement---

जगातील भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवणारा पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची लेक अंशा आफ्रिदीसोबत दुसऱ्यांदा संसार थाटला. सोमवारी (दि. 18 सप्टेंबर) मेहेंदी समारंभानंतर दोघांनी लग्न केले. यावेळी शाहीन आणि शाहिदने लग्नामध्ये आपल्या जवळच्या मित्रांनाही बोलवले होते.

अशातच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Captain Babar Azam) दिसत आहे. खरं तर, बाबर आझम शाहीन शाह आफ्रिदी (Babar Azam Shaheen Shah Afridi) याच्या लग्नात वऱ्हाडी म्हणून पोहोचला. बाबरने त्याच्या ट्विटरवरून आफ्रिदीला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. आता बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी (Babar Azam And Shaheen Afridi) यांच्या फोटो आणि व्हिडिओवरून त्यांच्यातील वादाच्या अफवांनाही पूर्णविराम लागला आहे.

बाबर आझमने शाहीन आफ्रिदीच्या लग्न समारंभाला हजेरी लावली
खरं तर, यजमान पाकिस्तान संघ आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतून श्रीलंकेविरुद्ध पराभूत होऊन स्पर्धेबाहेर झाला होता. अंतिम सामन्यात जागा मिळवण्यात पाकिस्तान अपयशी झाला होता. त्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता, ज्यात दिसत होते की, ड्रेसिंग रूममध्ये शाहीन आफ्रिदी आणि बाबर आझम एकमेकांशी बाचाबाची करत आहेत.

यानंतर असे म्हटले जाऊ लागले की, दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. मात्र, शाहीनने या अफवा खोट्या असल्याचे स्पष्ट केले. शाहीनने त्याच्या इंस्टाग्रामवर बाबरसोबतचा फोटो शेअर केला. यामध्ये त्याने “फॅमिली” म्हणजेच कुटुंब असे लिहिले होते. यासोबतच त्याने एक हार्ट इमोजीचाही समावेश केला होता.

https://www.instagram.com/p/CxXzykIr7j8/

दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जो फोटो शेअर केला आहे, त्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी एकत्र दिसत आहेत. दोन्ही खेळाडूंना एकमेकांची गळाभेट घेताना पाहिले जाऊ शकते. तसेच, बाबरने शाहीनच्या लग्नात वऱ्हाडी बनून चांगलीच मैफील लुटली.

शाहीनचे दुसऱ्यांदा लग्न
खरं तर, शाहीन आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदी (Shaheen Afridi And Ansha Afridi) यांनी यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कराची येथे लग्न केले होते. यामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि जवळच्या नातेवाईकांचा समावेश होता. काही महिन्यांनंतर आफ्रिदीने जाहीर केले की, तो आशिया चषक संपताच आपली पत्नी अंशासोबत दुसऱ्यांदा लग्न करणार. कारण, आधी शाहीन आणि अंशाच्या लग्नात फक्त जवळच्या मित्र मंडळींचा समावेश होता. (pakistan cricket team skipper babar azam attends shaheen afridi marriage see photos here)

हेही वाचाच-
रोहितने वनडे संघात अश्विनला का दिली जागा? भारतीय दिग्गजाने स्पष्टच सांगितलं; म्हणाला…
मोठी बातमी! भारतीय संघाच्या हुकमी एक्क्याला चढावी लागली कोर्टाची पायरी, काय लागला निकाल? लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---