पुणे: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित 15व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सुंदराराजन किदंबी, मुथय्या एएल, सत्यप्रग्यान स्वयंगसु, समीर काठमळे, हेरंभ भागवत यांसह एकूण 15 खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा सनसनाटी पराभव करत 3गुणांसह आघाडी मिळवली आहे.
अश्वमेध सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत तिस-या फेरीत तामिळनाडूच्या व अव्वल मानांकित ग्रॅन्डमास्टर सुंदराराजन किदंबीने महाराष्ट्राच्या मनोज जैनचा पराभव करून 3 गुण प्राप्त केले. तामिळनाडूच्या मुथय्या एएल याने महाराष्ट्राच्या आर्यन शहाचा 3 गुण मिळवले.
स्पर्धेचा सविस्तर निकालः
तिसरी फेरीः (व्हाईट व ब्लॅक या क्रमानुसार)
मनोज जैन (महा)(2गुण) पराभूत वि ग्रॅन्डमास्टर सुंदराराजन किदंबी(तामिळनाडू)(3गुण);
मुथय्या एएल(तामिळनाडू)(3गुण)वि.वि. आर्यन शहा(महा)(2गुण)
सत्यम वरूडे(महा)(2गुण)पराभूत वि आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसु(ओडिसा)(3गुण);
हरिकृष्णा ए.आरए(तामिळनाडू)(3गुण)वि.वि स्पर्श खंडेलवाल(महा)(2गुण)
जाईल दिगंबर(महा)(2गुण) पराभूत वि आयएम रत्नाकरन के (रेल्वे)(3गुण);
एफएम अमेय ऑडी(गोवा)(3गुण) वि.वि. शुभम कुंठेकर(महा)(2गुण)
आयएम समीर काठमळे(महा)(3गुण)वि.वि. प्रणित कोठारी(महा)(2गुण)
सम्मेद शेटे(एएमसीए)(3गुण)वि.वि. श्रेयान मजुमदार(महा)(2गुण)
एफएम सोहन फडके(महा)(2गुण) पराभूत वि हेरंभ भागवत(महा)(3गुण)
रवी बेहेरे(महा)(2गुण) पराभूत वि रित्वीज परब(गोवा)(3गुण)
डब्ल्युआयएम चंद्रेयी हजरा(पश्चिम बंगाल)(2गुण) पराभूत वि तनिशा बोरमणीकर(महा)(3गुण)
एफएम मट्टा विजय कुमार(आंध्रप्रदेश)(3गुण) वि.वि अनुष्का भांगे(महा)(2गुण)
एजीएम किरण पंडीतराव(सीआरएसबी)(3गुण) वि.वि अनिष अगवणे(महा)(2गुण)
कपिल लोहाना(महा)(3गुण) वि.वि गिरिष जोशी(महा)(2गुण)
अमेय दांडेकर(महा)(2गुण) पराभूत वि सिध्दांत गायकवाड(महा)(3गुण)








