जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. कोची येथे होणाऱ्या या मिनी लिलावात 405 खेळाडूंचे नाव पुकारले जाईल. त्यामध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू अल्लाह मोहम्मद घझनफार असेल. अल्लाह सध्या केवळ पंधरा वर्षांचा आहे.
आयपीएल 2023 च्या या लिलावात भारतीय व विदेशी मिळून 405 खेळाडूंची यादी अंतिम झाली आहे. मागील काही वर्षांपासून आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना मोठी मागणी वाढलीये. राशिद खान, मोहम्मद नबी व मुजीब उर रहमान यांच्यानंतर अनेक अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळताना दिसत आहेत. त्यामध्ये आता अल्लाह मोहम्मद याचे नाव सामील होऊ शकते.
अल्लाह मोहम्मद हा 15 वर्षांचा ऑफ स्पिनर आहे. 6 फुट 2 इंच अशी चांगली उंची लाभलेला अल्लाह सुरुवातीला वेगवान गोलंदाजी करत. मात्र, अफगाणिस्तानचा माजी कर्णधार दौलत ओमरझाई याच्या मार्गदर्शनानंतर त्याने फिरकीपटू होण्याचा निर्णय घेतला. अल्लाह अफगाणिस्तानचा प्रमुख असलेल्या मुजीब उर रहमान व भारताच्या रविचंद्रन अश्विन यांना आपले आदर्श मानतो. आयपीएल लिलावात त्याची आधारभूत किंमत 20 लाख इतकी असेल. यापूर्वी त्याने बिग बॉस लीग ड्राफ्टसाठी आपले नाव दिले होते. मात्र, त्याचा अंतिम यादीमध्ये समावेश झाला नव्हता.
आयपीएल लिलावात यावर्षी अफगाणिस्तानचे 8 खेळाडू दिसतील. तर राशिद खान गुजरात टायटन्स, रहमानुल्लाह गुरबाज कोलकाता नाईट रायडर्स व फजलहक फारूखी सनरायझर्स हैदराबाद या संघांचे यापूर्वीच प्रतिनिधित्व करत आहेत. यावर्षी नजीब झादरान व नवीन उल हक यांना संधी मिळू शकते असे बोलले जात आहे.
(15-year-old Afghanistan Spinner Allah Mohammad is the youngest player in the IPL auction Inspired From Ravichandran Ashwin)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आम्ही रिषभला काहीही बोलत नाही”; टीम इंडियाच्या प्रशिक्षकांचा धक्कादायक खुलासा
अखेर सचिनच्या अर्जुनने ठेवले रणजीच्या रणांगणात पाऊल! संपली तीन वर्षांची प्रतीक्षा




