पुणे। पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी) यांच्या वतीने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र राज्य 8 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटात निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत राज्यभरांतून एकूण 154 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर, प्रभातरोड, पुणे येथे 12 ते 13 मार्च 2022 रोजी होणार आहे.
पीडीसीसीचे सचिव डॉ. संजय करवडे आणि आरबीटर विनिता क्षोत्री यांनी सांगितले की, कोविडबाबतची सर्व काळजी या स्पर्धेदरम्यान घेणार येणार आहे. तसेच, सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन, प्रत्येक खेळाडूला प्रत्येक फेरीच्या आधी सॅनिटायझर देण्याची व्यवस्थादेखील आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. खेळाडूने सामन्याच्या वेळी मास्क लावणे हे अनिवार्य करण्यात आले आहे. ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने 9 फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेत पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बुलढाणा, नंदुरबार, सोलापूर, अकोला, चंद्रपूर, रायगड, सातारा, पालघर, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, जालना, सांगली या ठिकाणांहून एकूण 154 खेळाडूंनी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेत मानांकित खेळाडूंमध्ये अविरत चौहान(पुणे,1327), विहान अग्रवाल(मुंबई उपनगर,1325), चिराग लाहोटी(नागपूर, 1176), अर्जुन सिंग(मुंबई उपनगर, 1015), सोनी विवान(कोल्हापूर,1002) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटात 10000/- अशी पारितोषीक रक्कम देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन खेळाडू हे हरियाणा येथे होणाऱ्या 8 वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन होडेकचे हर्निश राजा, सिबायोसिस स्पोर्ट्स सेंटरचे डॉ.सतीश ठिगळे आणि पीडीसीसीचे उपाध्यक्ष अश्विन त्रिमल यांच्या हस्ते 12 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात येणार असून त्यानंतर स्पर्धेची पहिली फेरी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
डेक्कन जिमखाना-पीएमडीटीए तर्फे महिलांसाठी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मृणाल शेळके हिला विजेतेपद
केरलाविरुद्ध शील्ड विजेते जमशेदपूर ‘हॉट फेवरिट’ आयएसएल सेमीफायनल १ फर्स्ट लेग