नॉटिंगहॅम। आज(20 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात 26 वा सामना बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 381 धावांचा डोंगर उभा केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने दिडशतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने खास विक्रमही केला आहे.
वॉर्नरने या सामन्यात 147 चेंडूत 166 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 5 षटकार मारले. याबरोबरच त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीतील 16 वे शतकही पूर्ण केले. त्याने हे 16 वे शतक 110 व्या वनडे डावात खेळताना पूर्ण केले आहे.
त्यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 16 वे शतक करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याचबरोबर त्याने या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहलीची बरोबर केली आहे. विराटनेही 110 व्या वनडे डावात फलंदाजी करताना 16 वे शतक केले होते. या यादीत अव्वल क्रमांकावर हाशिम अमला आहे. अमलाने 94 व्या वनडे डावात 16 वे शतक केले होते.
वॉर्नरने सचिन तेंडुलकर, ख्रिस गेललाही टाकले मागे –
वॉर्नरची वनडेमध्ये 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही सहावी वेळ होती. त्यामुळे तो सर्वाधिक वेळा वनडेमध्ये 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
त्याने ख्रिस गेल आणि सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले आहे. त्यांनी 5 वेळा 150 धावांचा टप्पा वनडेमध्ये पार केला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आहे. त्याने 7 वेळा वनडेमध्ये 150 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
#सर्वात जलद 16 वनडे शतक करणारे क्रिकेटपटू –
94 डाव – हाशिम अमला
110 डाव – विराट कोहली/डेव्हिड वॉर्नर
126 डाव – शिखर धवन
128 डाव – जो रुट
#वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
7 वेळा – रोहित शर्मा
6 वेळा – डेव्हिड वॉर्नर
5 वेळा – ख्रिस गेल/सचिन तेंडुलकर
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारतीय संघाला पुन्हा धक्का, बुमराहच्या यॉर्करमुळे हा खेळाडू झाला दुखापतग्रस्त
–काय सांगता! टी२० सामन्यात या संघाने केले तब्बल ३१४ धावा, तर दुसरा संघ १० धावांवर सर्वबाद
–असा पराक्रम करणारा हाशिम अमला ठरला विराट कोहलीनंतरचा दुसरा क्रिकेटपटू