---Advertisement---

ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंड-आफ्रिकेच्या गोलंदाजांचे वर्चस्व; एकाच दिवसात 17 फलंदाज तंबूत

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 12:17 AM
---Advertisement---

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्याला अखेर तिसऱ्या दिवशी सुरुवात झाली. दोन दिवसांचा खेळ वाया गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 118 धावांवर संपवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनेही शानदार गोलंदाजी करत यजमानांच्या 7 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवण्यात यश मिळवले.

 

उभय संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतील हा सामना 8  सप्टेंबर रोजी सुरू होणार होता. मात्र, पावसामुळे मैदान खेळण्यासाठी तयार नसल्याने संपूर्ण दिवसाचा खेळ वाया गेला. त्याच सायंकाळी इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाल्याने दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. तिसऱ्या दिवशी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली देत खेळ सुरू केला गेला.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पुनरागमन करत असलेल्या ओली रॉबीन्सन व स्टुअर्ट ब्रॉड यांनी सार्थ ठरवत पहिल्या सत्रातच दक्षिण आफ्रिकेचे सहा गडी तंबूत पाठवले. या दोघांच्या भेदक गोलंदाजी पुढे दक्षिण आफ्रिकेचा डाव फार काळ टिकला नाही. 36.2 षटकात अवघ्या 118 धावांमध्ये त्यांचा डाव संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेसाठी जेन्सनने सर्वाधिक 30 धावा केल्या. रॉबीन्सनने 5 तर ब्रॉडने 4 बळी आपल्या नावे केले.

पहिला डावात मोठी आघाडी घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतले. त्यानंतर ओली पोप व जो रूट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रुटने 23 धावांचे योगदान दिले. तर पोपने सर्वाधिक 63 धावा केल्या. दिवसाखेर इंग्लंडने 7 बाद 154 धावा करत 36 धावांची आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी फलंदाजीत सर्वाधिक धावा करणाऱ्या मार्को जेन्सननेच सर्वाधिक चार बळी मिळवले. चौथ्या दिवशी इंग्लंडला लवकरात लवकर सर्वबाद करण्याचा प्रयत्न दक्षिण आफ्रिका संघ करेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

दुलीप ट्रॉफीमध्ये भारताच्या युवा फलंदाजाला ‘यश’! झंझावाती 193 धावांच्या जोरावर सावरला डाव
पुन्हा दिसला पाकिस्तानी खेळाडूंचा बालिशपणा! श्रीलंकेविरुद्धचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल
इंग्लंडसाठी आनंदाची बातमी! वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुनरागमनाच्या वाटेवर, लवकरच होणार संघात सामील  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---