---Advertisement---

‘आयपीएल २०२२’ कुठे होणार? भारतात की भारताबाहेर, सचिव जय शहांनी दिली महत्त्वाची माहिती

On: शनिवार, नोव्हेंबर 20, 2021 7:36 PM
ipl-trophy
---Advertisement---

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कोरोना महामारीमूळे आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा उत्तरार्ध संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळला गेला होता. मात्र, आता आयपीएलच्या पंधराव्या हंगामाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महत्त्वाची घोषणा करत भारतीय चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

या ठिकाणी होणार पुढील आयपीएल
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आयपीएलच्या पुढील हंगामाबाबत बोलताना म्हटले आहे की, आयपीएलचा पुढील हंगाम भारतात खेळवला जाईल. चेन्नई सुपर किंग्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले,
“मला माहित आहे तुम्ही सर्वजण तुमच्या संघाला चेपॉकवर खेळताना पाहण्यास उत्सुक आहात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आयपीएलचा पुढील हंगाम भारतात खेळविण्यात येईल. दोन नवे संघ आणि मेगा लिलावामूळे स्पर्धेची रंगत वाढलेली असेल.”
आयपीएलच्या पुढील हंगामात अहमदाबाद आणि लखनौ हे दोन संघ सहभागी होणार आहेत. तसेच, या हंगामात आधी खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---