---Advertisement---

इंग्लंडच्या 18 वर्षांच्या फलंदाजाचा ऐतिहासिक पराक्रम! सर्वात वेगवान शतक झळकावत रचला इतिहास

On: बुधवार, जानेवारी 21, 2026 6:04 PM
---Advertisement---

इंग्लंडचा 18 वर्षीय फलंदाज बेन मेयसने (Ben Meyas) आपल्या वादळी फलंदाजीने युथ वनडे क्रिकेटचा इतिहास बदलून टाकला आहे. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मेयसने अवघ्या 65 चेंडूत शतक ठोकले. मेयस आता अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे.

यासोबतच तो युथ वनडे मध्ये इंग्लंडसाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाजही ठरला आहे. मेयसने 117 चेंडूंचा सामना करत 191 धावांची तुफानी खेळी केली, ज्याच्या जोरावर इंग्लंडने 50 षटकांत 6 विकेट गमावून 404 धावांचा डोंगर उभा केला.

टॉस गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. बेन डॉकिन्स फक्त 5 धावा करून बाद झाला. यानंतर बेन मेयसने मोर्चा सांभाळला आणि दुसऱ्या विकेटसाठी जोसेफ मूर्ससोबत मिळून 188 धावांची भागीदारी केली. मूर्सने 65 चेंडूत 81 धावा केल्या. मेयसने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली आणि 65 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने आपल्या 191 धावांच्या खेळीत 18 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार लगावले.

बेन मेयस आता इंग्लंडकडून युथ वनडेमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभा करणारा खेळाडू बनला आहे. मेयसच्या या खेळीमुळेच अंडर-19 वर्ल्ड कपच्या इतिहासात इंग्लंडला पहिल्यांदाच 400 धावांचा टप्पा पार करता आला. शेवटच्या षटकांत सेबेस्टियन मॉर्गननेही 11 चेंडूत 24 धावांची फटकेबाजी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---