---Advertisement---

T20 WC26: पाकिस्तानचे आणखी सामने होऊ शकतात रद्द, सुपर-8ची एंट्री धोक्यात!

On: गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026 2:06 PM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधीच खूप चर्चेत आला. त्यामागचे कारण पाकिस्तान आणि बांग्लादेश. बांग्लादेश स्पर्धेतून बाहेर झाला असून पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे भारताला दोन अंक मिळण्याची शक्यता असताना पाकिस्तानच्या अडचणीत मात्र आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तान सुपर-८मधून बाहेरही जाऊ शकतो.

पाकिस्तान या स्पर्धेत भारत, नामिबिया, युएसए आणि नेदरलॅंड्ससोबत गट ए मध्ये आहे. यातील पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलॅंड्स विरुद्ध ७ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये सिंहली स्पोर्ट्स क्लबवर खेळला जाणार आहे. हा सामना संपूर्ण खेळला जाईल की नाही याची शंका आहे. हा सामना रद्द होण्याची अधिक लक्षणे आहे, कारण त्यादिवशी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

याच मैदानावर पाकिस्तानचा आयर्लंडविरुद्ध सराव सामना होता, तो देखील पावसामुळे रद्द झाला होता. यामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील बाकी सामने पण रद्द झाले तर ते सुपर-८मध्येही जाऊ शकणार नाही. हवामान खात्याने तर पूर्ण आठवडा पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे.

पाकिस्तानचा पहिला सामना सकाळी असून दुपारी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तो सामना रद्द झाला, तर त्यांच्याकडे दोनच सामने बाकी असतील. यातील एक सामना त्या संघाशी आहे, ज्यांनी त्यांना २०२४च्या टी२० विश्वचषकात पराभूत केले होते- युएसए. नंतर मग नेदरलॅंड्ससोबतच खेळणे बाकी राहिल. यामुळे कदाचित ते भारताविरुद्ध खेळण्याचा विचार करू शकतात.

या स्पर्धेत पाकिस्तान एकाही सामन्यात पराभूत झाला किंवा सामनाच रद्द झाला तर पाकिस्तान थेट स्पर्धेबाहेरच जाईल. तसेच सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्येच त्यांचे गटातील तीन सामने होणार असून भारताविरुद्धचा सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाकिस्तानला स्पर्धेत राहायचे असेल तर त्यांनी भारताविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करणे आवश्यक आहे.

बांग्लादेशला समर्थन करण्यासाठी पाकिस्तानने भारताच्या सामन्यावर बहिष्कार टाकला. बांग्लादेश आणि भारताचे यांच्यात राजकीय तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंना भारतात खेळण्यास असुरक्षितता वाटत होती. त्यासाठी त्यांनी त्यांचे सामने श्रीलंकेतही हलवण्याची विनंती आयसीसीला केली होती, मात्र ती नाकारली गेली. तसेच आयसीसीने पाकिस्तानला त्यांच्या बहिष्काराबाबत आणखी एकदा विचार करण्यास सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---