आयपीएलचा १३ हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले होते.
प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्स गमावत २०६ धावा केल्या. यादरम्यान पंजाबकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरलेला कर्णधार केएल राहुलने ६९ चेंडूत सर्वाधिक नाबाद १३२ धावांची शतकी खेळी केली. यामध्ये ७ षटकार आणि १४ चौकारांचा समावेश होता. या खेळीसह तो आयपीएल २०२० मध्ये पहिले शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच २००८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्यूलमने आरसीबीविरुद्ध सर्वाधिक नाबाद १५८ धावांची खेळी केली होती.
त्यानंतर २००९मध्ये एबी डिविलियर्सने, २०१०मध्ये यूसुफ पठाणने, २०११मध्ये पॉल वॉल्थटीने, २०१२मध्ये अजिंक्य रहाणेने, २०१३मध्ये शेन वॉटसनने, २०१४मध्ये लेंडल सिमन्सने, २०१५मध्ये पुन्हा ब्रेंडन मॅक्यूलमने, २०१६मध्ये क्विंटन डी कॉकने, २०१७मध्ये संजू सॅमसनने, २०१८मध्ये ख्रिस गेलने आणि २०१९ मध्ये पुन्हा संजू सॅमसनने हंगामातील पहिले शतक ठोकले होते.
राहुलने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४४.३८ च्या सरासरीने २१३० धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २ शतके आणि १६ अर्धशतके ठोकली आहेत.
आतापर्यंत आयपीएलच्या प्रत्येक हंगामात सर्वात पहिले शतक ठोकणारे फलंदाज
२००८- ब्रेंडन मॅक्यूलम
२००९- एबी डिविलियर्स
२०१०- यूसुफ पठाण
२०११- पॉल वॉल्थटी
२०१२- अजिंक्य रहाणे
२०१३- शेन वॉटसन
२०१४- लेंडल सिमन्स
२०१५- ब्रेंडन मॅक्यूलम
२०१६- क्विंटन डी कॉक
२०१७- संजू सॅमसन
२०१८- ख्रिस गेल
२०१९- संजू सॅमसन
२०२०- केएल राहुल*
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएलच्या इतिहासात धोनीसह सर्व यष्टीरक्षकांना राहुलने एका सामन्यात टाकलंय मागे, कारण…
-गोलंदाजीत फसला म्हणून काय झालं? फलंदाजी करताना ठोकले सलग ४ षटकार
-दिग्गज क्रिकेटपटूंच्या बायका आयपीएल दरम्यान घेतात ड्रग्स, पहा कुणी केलाय आरोप
ट्रेंडिंग लेख-
-चेन्नईच्या रखरखत्या उन्हात डीन जोन्सनी केली होती भारताविरुद्ध अफलातून खेळी
-आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा देणारे ७ गोलंदाज
-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज