---Advertisement---

पहिली कसोटी: केएल राहुल पाठोपाठ शिखर धवनचेही खणखणीत अर्धशतक

On: रविवार, नोव्हेंबर 19, 2017 3:33 PM
---Advertisement---

कोलकाता । येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर केएल राहुल पाठोपाठ शिखर धवननेही खणखणीत अर्धशतक केले आहे. 

शिखर धवनने ७७ चेंडूत ५१ धावा करताना ७ चौकार मारले आहेत. शिखर धवनचे हे कारकिर्दीतील ४थे अर्धशतक आहे. 

https://twitter.com/BCCI/status/932186735450120193

भारतीय संघाच्या २७ षटकांत ११६ धावा झाल्या असून संघ ६ धावांनी पिछाडीवर आहे.

तत्पूर्वी श्रीलंकेचा पहिला डाव आज २९४ धावांत संपुष्ठात आला. त्यांना पहिल्या डावात १२२ धावांची आघाडी मिळाली होती. भारताकडून भुवनेश्वर कुमार ४, मोहम्मद शमी ४ आणि उमेश यादव २ यांनी विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment