क्रिकेट आणि बॉलिवूडचे फार जुने नाते आहे. भारतात क्रिकेट आणि चित्रपटांना खूप पसंती दर्शवली जाते. आजवर काही क्रिकेटपटूंच्या जीवनावर हिंदी चित्रपट निघाले आहेत. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी, भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या जीवनावर आधारित अजहर यांचा यात समावेश होतो. तसेच, भाग मिल्खा भाग, मॅरी कॉम असे अन्य खेळातील प्रसिद्ध खेळाडूंच्या जीवनावरही चित्रपटही निघाले आहेत.
अशा बायोपिकव्यतिरिक्त क्रिकेटवरही काही शानदार हिंदी चिंत्रपट निघाले आहेत, जे चाहत्यांनाही मोठ्या प्रमाणात आवडले.
चला तर नजर टाकूया, क्रिकेटवर आधारित त्या शानदार बॉलिवूड चित्रपटांवर – 2 Bollywood Movies Based On Cricket
लगान (२००१) –
स्वातंत्र्यापुर्वी भारतात इंग्रजांची राजवट होती. ते भारतातील छोटछोट्या गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांकडून कर वसूल करत असायचे. यावर आधारित ‘लगान’ या चित्रपटाची कहानी आहे. या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, एका गावातील लोक त्यांच्यावर आकारला जाणारा लगान (कर) बंद करण्यासाठी इंग्रजांविरुद्ध क्रिकेट सामना खेळतात. जर त्यांनी तो सामना जिंकला तर त्यांच्यावर आकारण्यात येणारे सर्व कर रद्द होतील आणि जर ते पराभूत झाले तर, त्यांच्याकडून ३पटिने जास्त कर वसूल करण्यात येईल, अशी अट असते.
गावातील लोक एकत्र येऊन कशाप्रकारे त्यांचा क्रिकेट संघ तयार करतात. कशाप्रकारे सराव करतात, हे दाखवले आहे. शेवटी क्रिकेट सामना चालू होतो. अतिशय रोमांचक घडीला आलेल्या सामन्यात भुवनची भूमिका निभावणारा बॉलिवूड अभिनेता आमिर खान शेवटी जबरदस्त षटकार मारतो. पण, हवेतील तो चेंडू कॅप्टन रसल झेलतो. मात्र, कॅप्टन सीमारेषेपलीकडे जाऊन तो झेल झेलतो. अशाप्रकारे भुवनचा संघ तो सामना जिंकतो, अशी या चित्रपटाची कहानी आहे.
लगान या चित्रपटाला आस्कर्स अवॉर्डचे नामांकन मिळाले आहे. २००१मध्ये आलेला हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. तसेच, या चित्रपटाला ८ राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.
इकबाल (२००५) –
गेल्या २ दशतकातील सर्वाधिक प्रेरणादायी कहानी म्हणजे ‘इकबाल’ या चित्रपटाची कहानी. एक असा मुलगा, जो ऐकू शकत नाही (बहिरा) आणि बोलूही शकत नाही (मुका). पण, लहानपणीपासूनच त्याला क्रिकेटची फार आवड असते. इकबालची बहीण आणि त्याचे प्रशिक्षक त्याला चांगला गोलंदाज बनण्यात खूप सहकार्य करतात.
श्रेयस तळपडे या अभिनेत्याने चित्रपटात इकबालची भूमिका केली आहे. तर, नसिरुद्दीन शहा हे त्याचे प्रशिक्षक असतात, जे माजी क्रिकेटपटू असतात. वडीलांच्या विरोधाचा सामना करत आपल्या मेहनत आणि जिद्दीने इकबाल भारतीय संघात जागा मिळवतो. या चित्रपटात भारताचे माजी कर्णधार कपिल देवही एका सीनमध्ये आहेत.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: असे ३ परदेशी खेळाडू, ज्यांचा फॉर्म ठरेल त्यांच्या संघासाठी सर्वाधिक फायद्याचा
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ संघ, अव्वल स्थानी धोनीची सीएसके नव्हे तर…
महत्त्वाच्या बातम्या –
उमर अकमलची बंदी कमी करण्याबद्दल भडकला त्याचाच संघसहकारी, म्हणाला…
आयपीएल जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग, पाकिस्तानच्या या माजी खेळाडूने केले कौतुक
आयर्लंड विरुद्ध इंग्लंडचा मोठा विजय, या गोलंदाजाने टाकले तब्बल ३५ डॉट बॉल