मुंबई । स्विंगचा सुलतान मानला जाणारा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने आयपीएलचे कौतुक केले आहे. अक्रमच्या मते, आयपीएल जगातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. बीसीसीआय आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पैसे गुंतवत आहे, ज्यामुळे त्यांना चांगले परिणाम मिळू लागले आहेत.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये फरक असल्याचे अक्रमने सांगितले. तो म्हणाला की, “इंडियन प्रीमीयर लीगमध्ये जेवढे पैसे गुंतले ते पाहून वाटते की ही जगातली सर्वात मोठी लीग आहे.” आयपीएलमधून मिळालेले पैसे प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी वापरण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचेही अक्रमने कौतुक केले आहे.
अक्रमने आपल्या यूट्यूब कार्यक्रमात तनवीर अहमदला सांगितले की, ”आयपीएल आणि पीएसएलमध्ये फरक आहे. त्यांनी बरीच गुंतवणूक केली आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे.”
तो म्हणाला, ”खेळाडू खरेदी करण्यासाठी संघाचे बजेट 60-80 कोटी आहे. ते आमच्या पैशांच्या तुलनेत दुप्पट होईल. बीसीसीआय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये याचा उपयोग करतो. आयपीएलमधे प्रवीण अमरे यांच्यासारखे देशातले प्रशिक्षक असतात. ते अशा माजी खेळाडूंना नोकरी देतात, जे पुढे चांगले प्रशिक्षक बनतात.”
या माजी वेगवान गोलंदाजांच्या म्हणण्यानुसारच, अलीकडेच एक चांगले, विश्वासू खेळाडू मिळविण्यात भारत यशस्वी झाला आहे. भारताचे फलंदाज आत्मविश्वासाने खेळतात. त्यांची सिस्टीम वेगळी असल्याचे वसीम अक्रम यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयर्लंड विरुद्ध इंग्लंडचा मोठा विजय, या गोलंदाजाने टाकले तब्बल ३५ डॉट बॉल
क्रिकेट फॅनने विचारले तुझे वय काय? शाहिद आफ्रिदीने दिले ‘हे’ उत्तर
इंग्लंडला विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी आयपीएलची झाली अशी मदत, मॉर्गनने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: असे ३ परदेशी खेळाडू, ज्यांचा फॉर्म ठरेल त्यांच्या संघासाठी सर्वाधिक फायद्याचा
आपल्या देशासाठी जखम झालेलं स्वत:चं बोट कापायलाही तयार झालेला क्रिकेटर
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ७- हेडनची पर्थच्या मैदानावर कसोटीतील वनडे स्टाईल फटकेबाजी