---Advertisement---

पराक्रम केला ६ वर्षांपुर्वी, जगाला माहित झाला आज

---Advertisement---

भारताचा फिरकीपटू गोलंदाज प्रज्ञान ओझाने आज(21 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्याने ट्विटरवर पोस्ट करत निवृत्तीबद्दल माहिती दिली.

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 सामन्यात 144 विकेट्स घेणाऱ्या ओझाने क्रिकेटमध्ये एक खास कारनामा केला आहे. पण त्याचा हा विक्रम त्याने निवृत्ती घेतल्याने सर्वांसमोर आला आहे.

त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचा सामना 14 ते 16 नोव्हेंबर 2013दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिकेत खेळला. याच सामन्यात त्याने दोन्ही डावात प्रत्येकी 5 अशा मिळून 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळताना दोन्ही डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो 6 वा क्रिकेटपटू ठरला आहे.

विशेष म्हणजे ओझाच्या आधी असा पराक्रम शेवटचा 76 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या क्लॅरी ग्रिमेट यांनी 1936ला केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध किंग्समेड येथे कारकिर्दीतील शेवटचा सामना  खेळताना क्लॅरी ग्रिमेट यांनी पहिल्या डावात 7 आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या होत्या. 

तसेच त्यांच्याआधी असा पराक्रम चार्ल मॅरिएट, सिडनी बर्न्स, हर्बर्ट हॉर्डन आणि जॉन फेरीस यांनी केला आहे.

ओझाची त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील ही शानदार कामगिरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरमुळे झाकोळली गेली होती. कारण ओझाचा शेवटचा सामना हा सचिनचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना होता.

कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज – 

 – जॉन फेरीस – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, न्यूलँड्स, 1892 (पहिला डाव – 6 विकेट्स, दुसरा डाव – 7 विकेट्स)

– हर्बर्ट हॉर्डन – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, सिडनी, 1912 (पहिला डाव – 5 विकेट्स, दुसरा डाव – 5 विकेट्स)

– सिडनी बर्न्स – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, लॉर्ड्स, 1914 (पहिला डाव – 7 विकेट्स, दुसरा डाव – 7 विकेट्स)

– चार्ल मॅरिएट – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, केनिंगटन ओव्हल, 1933 (पहिला डाव – 5 विकेट्स, दुसरा डाव – 6 विकेट्स)

– क्लॅरी ग्रिमेट – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, किंग्समेड, 1936 (पहिला डाव – 7 विकेट्स, दुसरा डाव – 6 विकेट्स)

– प्रज्ञान ओझा – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मुंबई, 2013 (पहिला डाव – 5 विकेट्स, दुसरा डाव – 5 विकेट्स)

https://twitter.com/Maha_Sports/status/1230751652220567552

https://twitter.com/Maha_Sports/status/1230736216166780928

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---