---Advertisement---

या आहेत महिला विश्वचषकातील मराठमोळ्या ‘रन’रागिणी…

On: शनिवार, मार्च 7, 2020 6:32 PM
---Advertisement---

भारतीय महिला संघ हा ऑस्ट्रेलिया महिला संघाविरूद्ध मेलबर्न येथे आज(८ मार्च)ला महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत आहे. यासंघात दोन मराठमोळ्या खेळाडूही आपले योगदान देत आहेत. स्मृती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्ज ही त्यांची नावे.

स्मृती मंधानाचा जन्म 18 जुलै 1996 ला मुंबईमध्ये झाला.  स्मृती मंधाना पहिल्यांदा प्रकाशझोतात आली ते म्हणजे ऑक्टोबर 2013 मध्ये. ती पहिली भारतीय महिला खेळाडू जिने वनडे सामन्यात द्विशतक झळकावले. महाराष्ट्राकडून गुजरातविरूद्ध खेळताना तिने  150 चेंडूत 224 धावा केल्या.  

तिने एप्रिल 2013मध्ये T20 मधून भारतीय महिला संघात पर्दापण केले. तर ऑगस्ट 2014मध्ये कसोटी खेळायला सुरूवात केली. स्मृती मंधानाने तिचे पहिले वनडे शतक ऑस्ट्रेलिया संघाविरूद्धच 2016मध्ये झळकवले. तिची वनडे मधील सर्वाधिक धावसंख्या 135 (वि. साउथ आफ्रिका) आहे. मे 2019मध्ये तिला इंटरनॅशनल वूमन क्रिकेटर ऑफ द ईयर अवॉर्ड मिळाला.

जेमिमाह रॉड्रिग्जही स्मृती मंधानाप्रमाणे मुंबईकर आहे. 5 सप्टेंबर 2000ला तिचा जन्म  झाला. ती क्रिकेट शिवाय हॉकीसुध्दा खेळते.  रॉड्रिग्जही मंधानानंतर वनडे सामन्यात द्विशतक झळकावणारी दुसरीच महिला खेळाडू आहे. मुंबईकडून सौराष्ट्राविरूद्ध 163 चेंडूत 202 धावा केल्या होत्या.

फेब्रुवारी 2018मध्ये तिचे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पर्दापण झाले तर वनडे पर्दापण मार्च 2018मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध केले. वनडेमध्ये तीने 81 तर T20 खेळताना 72 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---