नुकताच यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर येत्या २०२२ मध्ये आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेचे आयोजन न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरीतील सामने पार पडणार आहेत. या स्पर्धेत श्रीलंका संघातील ३ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
हरारेमध्ये बायो बबलच्या नियमांचे पालन करून ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. दरम्यान, २ खेळाडूंमध्ये लक्षणे आढळून आली असता सर्व सदस्यांची चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये ३ खेळाडू पॉसिटीव्ह असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, तिसऱ्या खेळाडूंमध्ये कुठलीही लक्षणे दिसून आली नाहीये. तिन्ही खेळाडू क्वारंटाईनमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
श्रीलंका संघातील उर्वरित सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र खबरदारी म्हणून संपूर्ण संघ क्वारंटाईनमध्ये आहे. मंगळवारी (२३ नोव्हेंबर) श्रीलंका संघाचा सामना नेदरलँड संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी श्रीलंका संघातील खेळाडूंची पुन्हा एकदा चाचणी करण्यात येणार आहे.
आयसीसीचे स्पर्धा प्रमुख ख्रिस टेटली यांनी म्हटले की, “दुखापती, आजार किंवा कोव्हिड-१९ परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही संघांना १५ खेळाडू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यासह संघांना अतिरिक्त खेळाडू आणण्यास देखील परवागणी दिली आहे. श्रीलंकेच्या संघातील उर्वरित सदस्यांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.”
या ५ संघांनी केले आहे क्वालिफाय
आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ स्पर्धेचे आयोजन न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा कालावधी ४ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत असणार आहे. या स्पर्धेत ८ संघ खेळताना दिसून येणार आहेत, तर ५ संघांनी आधीच प्रवेश निश्चित केला आहे. ज्यामध्ये न्यूझीलंडसह, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाचा समावेश आहे. उर्वरित ३ संघ पात्रता फेरीतील सामने जिंकून या स्पर्धेसाठी क्वालिफाय करणार आहेत. हे स्पर्धेचे १२ वे पर्व असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघाने सर्वाधिक ६ वेळेस या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडचा ३-० ने धुव्वा उडवण्यात ‘या’ ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची भूमिका
जर्मनीच्या झ्वेरेवने जिंकले दुसऱ्यांदा एटीपी फायनल्सचे विजेतेपद, अंतिम सामन्यात मेदवेदेव पराभूत
फॅन मुमेंट! सेक्युरीटी गार्डला चकवा देऊन चाहत्याने थेट मैदानात केला प्रवेश अन् धरले मुस्तफिजूरचे पाय