रोहित शर्मा सध्या भारतीय संघाचा मुख्य फलंदाज आहे. रोहित शर्मा कारकिर्दीच्या सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजी करायचा, पण एमएस धोनीने २०१३ मध्ये त्याला नियमीत सलामीला फलंदाजी करण्याची संधी दिली आणि तेथून रोहित शर्माचे नशीब बदलले. त्यानंतर रोहित शर्माने कधी मागे वळून पाहिले नाही आणि आज तो वनडे इतिहासातील एक दिग्गज स्फोटक फलंदाज बनला आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत वनडेमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. वनडे सामन्यात ३ दुहेरी शतक ठोकण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे. याशिवाय वनडेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा तो फलंदाज आहे. रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यात २६४ धावांची जबरदस्त तुफानी खेळी खेळली होती.
रोहित शर्मा षटकार मारण्याच्या बाबतीत अनेकदा मागे-पुढे पाहत नाही. एकदा खेळपट्टीवर स्थिर झाल्यानंतर त्याने अगदी सहज षटकार मारले आहेत. आतापर्यंत त्याने षटकारांच्या बाबतीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. एका वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीतही रोहित पहिल्या 2 क्रमांकावर विराजमान आहे. या लेखात तुम्हाला त्या २ वनडे सामन्यांविषयी सांगणार आहोत ज्यात रोहित शर्माने सर्वाधिक षटकार लगावले.
या २ सामन्यात रोहित शर्माने सर्वाधिक वेळा चेंडू सीमारेषा पार केला-
१६ षटकार – वि. ऑस्ट्रेलिया, बेंगळूरू २०१३
रोहित शर्मा मैदानात स्थिरावल्यानंतर गोलंदाजांना चांगली कामगिरी करणे कठीण जाते. असेच काहीसे नोव्हेंबर २०१३ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बेंगळुरूमध्ये झालेल्या वनडे सामन्यात झाले. त्या सामन्यात रोहित शर्माने २०९ धावांची स्फोटक खेळी केली. हे रोहितचे पहिले वनडे द्विशतक होते.
या खेळीत रोहितने १६ षटकार लगावले होते. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३८३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ ४५.१ षटकांत ३२६ धावांवर बाद झाला. भारतीय संघाने हा सामना ५७ धावांनी जिंकला. रोहित शर्माची ही खेळी लक्षात राहण्यासारखी आहे.
१२ षटकार – वि. श्रीलंका, मोहाली २०१७
श्रीलंकेविरूद्ध मोहाली येथे झालेल्या या सामन्यात रोहित शर्माने नाबाद २०८ धावांची खेळी केली. त्या डावात रोहित शर्माने १५३ चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि १२ षटकार ठोकले होते. हे रोहितचे तिसरे द्विशतक होते. त्यावेळी तो वनडेत ३ दुहेरी शतक करणारा पहिला फलंदाज ठरला होता.
रोहित शर्माच्या या खेळीमुळे भारतीय संघाने ४ गाड्यांच्या मोबदल्यात ३९२ धावांचा विशाल डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ ८ गडी गमावून २५१ धावा करू शकला आणि भारताने या सामन्यात १४१ धावांनी विजय मिळविला होता.
ट्रेंडिंग लेख –
आचरेकर सर म्हणत, “प्रवीण हा सचिनपेक्षा काकणभर सरस आहे”
या ३ खेळाडूंनी मारलेत सीएसकेसाठी सर्वाधिक षटकार
टक्कल असलेल्या क्रिकेटपटूंची ‘ऑल टाईम ११ टेस्ट टीम’, पहा कोण झालंय कर्णधार
महत्त्वाच्या बातम्या –
वयाच्या १८ व्या वर्षी एमएस धोनीला ओळख मिळवून देणाऱ्या स्पर्धेबद्दल घ्या जाणून…
चेन्नईचा हुकमी एक्का रविंद्र जडेजा दिसणार नाही सीएसकेसोबत, हे कारण देत…
धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ पाहून झाले दिग्गज क्रिकेटपटू हैराण