इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ENGvsNZ) यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याचा निकाल मंगळवारी (१४ जून) लागला. या सामन्यात शेवटच्या डावात इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) याने झंजावाती शतक ठोकले तर कर्णधार बेन स्टोक्सने विजयी ७५ धावांची विजयी खेळी केली. इंग्लंडने शेवटच्या दिवशी ५ विकेट्स राखून हा सामना नावावर केला. मात्र पुन्हा एकदा इंग्लंडला संथ गतीने षटक टाकल्याचे परिणाम भोगावे लागले आहे.
इंग्लंडने दुसऱ्या कसोटीमध्ये संथ गतीने षटक टाकल्याने त्यांचे २ गुण आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रमवारीतुन (ICC World Test Championship) कमी केले आले आहेत. इंग्लंडने एकूण ५२ गुण मिळवले आहेत आणि त्यातील १२ गुण गमावले आहेत. इंग्लंड प्रमाणेच भारत आणि वेस्ट इंडिज या संघाचेही गुण आयसीसीने कापले आहेत. भारताचे ८० गुण झाले असून त्यातील तीन गुण गमावले आहेत. वेस्ट इंडिजने ३२ गुणांची कमाई केली असून या संघाला दोन गुणांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या तीन संघांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही संघाला दंड ठोठावण्यात आलेला नाही.
आयसीसीच्या नियमांनुसार, जेव्हा संघ निर्धारित वेळेत निर्धारित षटके खेळू शकला नाही, तेव्हा त्याला दंड आकारला जातो. संघाने निर्धारित वेळेत जितकी षटके कमी केली तितक्याच गुणांसाठी दंड आकारला जातो. इंग्लंड संघाला आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीत निर्धारित वेळेत १२ षटके वेेळेत टाकता आलेली नाहीत. त्यामुळे या संघाला १२ गुणांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही इंग्लंडच्या संघाला निर्धारित वेळेत दोन षटके पूर्ण करता आली नाही. त्यामुळे इंग्लंडला दोन गुणांचा फटका बसला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या चालू हंगामात भारतीय संघाने ११ सामन्यांतून ८० गुण मिळवले आहेत. तीन गुणांच्या पेनल्टीमुळे भारताचे ७७ गुण झाले आहेत. भारताची गुण टक्केवारी ५८.३३ आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आफ्रिकन संघाची गुण टक्केवारी ७१.४३ आहे. भारतीय संघाला तीन गुणांचा दंड ठोठावला नसता तर भारताचे ८० गुण झाले असते. अशा स्थितीत भारताच्या गुणांची टक्केवारी ७२.७२ झाली असती आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत आफ्रिकेऐवजी दुसऱ्या स्थानावर राहून अंतिम सामना खेळण्याचा भारत प्रबळ दावेदार होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरेरे! दुसऱ्या कसोटी विजयासह मालिकाही खिशात घातलेल्या इंग्लंडला आयसीसीकडून दंड, २ गुणही कापले
मार्नस लाबुशेनला मागे टाकत जो रुट बनला ‘नंबर १’ कसोटी फलंदाज, पाहा ताजी आयसीसी रँकिंग
कसोटी खेळतोय की टी२०! इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने केवळ ‘इतक्या’ चेंडून शतक ठोकत रचलाय विक्रम






