आज इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अॅंडरसनचा ३६वा वाढदिवस. कसोटी क्रिकेटमध्ये १३८ सामन्यात ५४० विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाला इंग्लंडचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज समजले जाते.
अशा या महान गोलंदाजाबद्दल काही खास गोष्टी-
-जेम्स अॅंडरसनचा जन्म ३० जूलै १९८२ रोजी बर्नली, लँकेशायर येथे झाला. त्याचे पुर्ण नाव जेम्स मायकेल अॅंडरसन.
#OnThisDay
In 1982, one of England's greatest bowler James Anderson was born
Happy birthday Jimmy! pic.twitter.com/Evc2XR0V7E— Candice Furlon (@Crickgeek) July 30, 2016
-त्याने क्रिकेट खेळायला खूपच लवकर सुरुवात केली आणि वयाच्या १७व्या वर्षीच तो लँकेशायरमधील एक वेगवान गोलंदाज म्हणुन ओळखला जात होता.
-वयाच्या २०व्या वर्षीच त्याने वनडे कारकिर्दीला सुरुवात केली. मेलबर्न क्रिकेट मैदानावर त्याने पारंपारिक प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला. यात त्याने अॅडम गिलख्रिस्टला त्रिफळाचीत केले होते.
Happy Birthday James Anderson! King of such peaches! 🔥 pic.twitter.com/rhymVdQ6yb
— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) July 30, 2017
-अॅटिट्युड या मासिकासाठी न्युड फोटोशेसन करणारा तो जगातील पहिला क्रिकेटर ठरला होता.
-त्याचा क्रिकेटर मित्र ग्रॅमी स्वाॅनबरोबर त्याने रेडियोवर एका कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले होते. क्रिकेट या विषयावर असलेल्या या कार्यक्रमाचे नाव Not Just Cricket असे होते.
LGBT समुदायासाठी असलेल्या खास मासिकासाठी न्युड फोटोसेशन करणाऱ्या.. इंग्लंडकडून वनडे आणि कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला १४ कसोटीत ९वेळा बाद करणाऱ्या जेम्स अॅंडरसनला ३६व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. #म #मराठी pic.twitter.com/5qOJRyTmgG
— Sharad Bodage (@SharadBodage) July 30, 2018
-मे २००३ ला कसोटी पदार्पण करण्यापुर्वी एक आठवडा आधी त्याने लँकेशायरकडून हॅट्रिक घेणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनण्याचा मान मिळवला होता.
-पदार्पणाच्या कसोटीत त्याने पहिल्याच डावात झिंबाब्वेविरुद्ध १६ षटाकांत ७३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
Happy BdayJames Anderson @jimmy9 .Before u most popular Anderson here was Pamela Anderson.#ModernDayGreat pic.twitter.com/jvnn2ufPnd
— Virender Sehwag (@virendersehwag) July 30, 2016
-त्याची एकवेळी डेविड बेकहमशी लूक्स आणि स्टाईलबद्दल तुलना केली जात असे.
-जेम्स अॅंडरसन हे नाव अनेक खेळात महान झालेल्या खेळाडूंचेही आहे. एवढेच नाही तर याच नावाचा एक खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळला आहे.
-अॅंडरसन मायकेल वाॅनच्या नेतृत्वाखाली २१ कसोटी सामने खेळला. त्यात त्याने ३४.४६च्या सरासरीने ७६ विकेट्स घेतल्या. त्याला मायकेल वाॅन हा कर्णाधार म्हणुन कधीच आवडला नाही. “एका चांगल्या कर्णधाराला माहीत असते की आपल्या टीमशी कसा संवाद साधला पाहिजे. मला वाटत नाही की मायकेल वाॅनला ते कधी जमलेच नाही. ” असे तो एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता.
-जेम्स अॅंडरसनच्या दाढीचेही ट्विटर अकाऊंट आहे. १४२७ फाॅलोवर्स या अकांऊंटला आहेत.
https://twitter.com/beard_anderson/status/494184374829858816?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E494184374829858816&ref_url=http%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Farticles%2F15-things-you-need-to-know-about-james-anderson-164640
-या शतकातील कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाजात अॅंडरसन दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १३८ सामन्यात ५४० विकेट्स घेतल्या आहेत तर अव्वल स्थानी मुरलीधरन असून या शतकात त्याने ८५ सामन्यात ५७३ विकेट्स घेतल्या आहेत.
Happy Birthday to England's all-time leading wicket taker in Tests, @jimmy9! pic.twitter.com/xsaXaSpVEX
— ICC (@ICC) July 30, 2016
-कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला अॅंडरसनने १४ कसोटीत तब्बल ९वेळा बाद केले आहे. या प्रकारात सचिनला कुणीही एवढ्या वेळा बाद केलेले नाही.
Happy Birthday to @ECB_cricket pace bowler @jimmy9, who turns 32 on Wednesday. What is his best bowling performance? pic.twitter.com/nQ8ZKcaZsu
— ICC (@ICC) July 30, 2014
-इंग्लंडकडून वनडेत हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज होण्याचा मान अॅंडरसनच्या नावावर आहे. त्याने २००३ला पाकिस्तानविरुद्ध अब्दुल रझ्झाक, शोएब अख्तर आणि मोहम्मद शमीला बाद केले होते.
James Anderson had picked up 5 wickets on his birthday at Nottingham v Pakistan on 30 July 2010
Today reached a 5wkt haul#EngvInd— Mohandas Menon (@mohanstatsman) July 30, 2014
-कसोटीप्रमाणेच इंग्लंडकडून सर्वाधिक वनडे विकेट्स घेण्याचा विक्रमही अॅंडरसनच्या नावावर आहे. त्याने १९४ वनडेत २६९ विकेट्स घेतल्या आहेत.
Happy Birthday to England's all-time leading wicket taker in Tests, @jimmy9!
What is your favourite Anderson spell in the Test arena? pic.twitter.com/TbBKf2HZdp
— ICC (@ICC) July 30, 2017
-इंग्लंडकडून केवळ दोन खेळाडू आजपर्यंत १९०पेक्षा जास्त वनडे सामने खेळले आहेत. त्यात पाॅल काॅलिंगवुडने १९७ तर जेम्स अॅंडरसनने १९४ सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे या १९४ सामन्यात ७९ डावात फलंदाजी करताना त्याने जेमतेम २७३ धावा केल्या आहेत.
Happy Birthday to @englandcricket's leading wicket taker in Tests, @jimmy9! pic.twitter.com/UQ2TiVdfYt
— ICC (@ICC) July 30, 2015
-भारत विरुद्ध इंग्लंड या १ आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत अॅंडरसनला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याने जर या मालिकेत २४ विकेट्स घेतल्या तर कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज बनेल. सध्या ग्लेन मॅकग्राॅच्या नावावर १२४ कसोटीत ५६३ तर अॅंडरसनच्या नावावर १३८ कसोटीत ५४० विकेट्स आहेत.
-याच मालिकेत ५ सामन्यात मिळून त्याने २४ विकेट्स घेतल्या तर कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानी येईल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-तडाखेबंद खेळी करत स्म्रीती मानधनाने केली विश्वविक्रमाची बरोबरी
-गांगुलीला मागे टाकत कॅप्टन कोहली होणार नवा ‘दादा’?