इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 6 सप्टेंबरपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडनं दोन दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली.
नियमित कर्णधार बेन स्टोक्सला दुखापत झाली, ज्यानंतर ऑली पोप इंग्लंड संघाचं नेतृत्व करत आहे. इंग्लंडनं पहिले दोन सामने जिंकून मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. त्यानंतर आता तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडनं मॅथ्यू पॉट्सच्या जागी जोशुआ हलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलंय. 20 वर्षांचा जोश हल हा वेगवान गोलंदाज असून तो इंग्लंडकडून कसोटी पदार्पण करेल.
जोश हलनं आतापर्यंत फक्त 10 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 16 विकेट घेतल्या. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. जोश हल सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघाचा भाग नव्हता. परंतु मार्क वुडला दुखापत झाल्यानंतर त्याला बदली म्हणून संघात स्थान मिळालं.
श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडनं दमदार कामगिरी केली आहे. इंग्लिश संघानं पहिली कसोटी 5 गडी राखून तर दुसरी कसोटी 190 धावांनी जिंकली. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट या मालिकेत तुफान फॉर्मात आहे. रुटनं दोन सामन्यांच्या चार डावात 116.67 च्या सरासरीनं 350 धावा ठोकल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे.
या कसोटी मालिकेत आघाडीच्या फळीतील फलंदाजांची निराशाजनक कामगिरी श्रीलंकेच्या पराभवाचं मोठं कारण ठरली. दुसरीकडे, श्रीलंकेच्या गोलंदाजांची कामगिरी मात्र चांगली राहिली आहे. मालिकेत श्रीलंकेच्या आशिता फर्नांडोनं सर्वाधिक (14) विकेट घेतल्या आहेत.
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – डॅन लॉरेन्स, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रुट, हॅरी ब्रूक (उपकर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ॲटिनसन, ऑली स्टोन, जोश हल, शोएब बशीर
हेही वाचा –
WTC फायनलच्या फॉरमॅटमध्ये बदल करण्याची मागणी, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची आयसीसीला महत्त्वपूर्ण सूचना
घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने गमावणारे 5 संघ, कोणाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद?
महाराष्ट्राच्या पठ्ठ्याचा पॅरिसमध्ये डंका! सांगली जिल्ह्यातील सचिन खिलारीनं पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं रौप्य पदक