---Advertisement---

सलग तीन दिवस पाऊस पडूनही ‘त्या’ कसोटी सामन्याचा लागला होता निकाल

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 12:55 PM
---Advertisement---

बरोबर 21 वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात एक असा कसोटी सामना झाला होता. ज्याचा विचार कोणीही केला नसले. सेंच्यूरियन येथे 2000 साली 14 ते 18 जानेवारी दरम्यान झालेल्या या सामन्यातील सलग दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पाऊस पडल्याने खेळ झाला नव्हता. तरीही या सामन्याचा निकाल लागला होता.

हा सामना नासिर हुसेन कर्णधार असणाऱ्या इंग्लंड संघाने 2 विकेट्सने जिंकला होता. झाले असे की पाचव्या दिवशी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हन्सी क्रोनिएने इंग्लंडला 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची ऑफर दिली. ही ऑफर इंग्लंडचा कर्णधार हुसेनने स्विकारली आणि रोमांचकारी झालेल्या या सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवला.

असा झाला सामना – 

5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना होता. या मालिकेत दक्षिण आफ्रिका आधीच 2-0 फरकाने विजयी आघाडीवर होती. त्यामुळे शेवटच्या सामन्याचा मालिका विजेतेपदावर कोणताही परिणाम होणार नव्हता.

या सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. त्यानुसार पहिल्या दिवशी पाऊस सुरु होण्याआधी दक्षिण आफ्रिकेने 6 बाद 155 धावा केल्या होत्या.

त्यानंतर सगल दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नाही. पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने त्यांचा पहिला डाव 8 बाद 248 धावांवर घोषित केला आणि क्रोनिएने हुसेनला ऑफर दिली की 249 धावांचे लक्ष्य उर्वरित 76 षटकात पार करायचे.

ही ऑफर हुसेनने स्विकारली. त्यानुसार दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या सहमतीनंतर इंग्लंडने त्यांचा पहिला डाव बिनबाद 0 धावांवर घोषित केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनेही त्यांचा दुसरा डाव बिनबाद 0 धावांवर घोषित केला. त्यांच्या या निर्णयानंतर पंचांनी हे दोन्ही डाव घोषित झाल्याचे सांगितले.

त्यामुळे इंग्लंडसमोर पाचव्या दिवशीच्या उर्वरित 76 षटकात 249 धावांचे विजयासाठी आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने दुसऱ्या डावात माइक आर्थरटनची विकेट लवकर गमावली. त्यापाठोपाठ मार्क बाऊचर, नासिर हुसेन, ख्रिस ऍडम हे देखील नियमित कालांतराने बाद झाले. त्यामुळे इंग्लंडची आवस्था 37.1 षटकात 102 धावांवरच 4 विकेट अशी झाली.

पण त्यानंतर ऍलक स्टिवर्ट आणि मायकल वॉन यांनी पाचव्या विकेटसाठी 126 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी नांती हेवर्ड यांनी स्टिवर्ट यांना 73 धावांवर बाद करत तोडली. पण तोपर्यंत इंग्लंड विजयाच्या समीप आले होते.

मात्र डॅरेन मॅडी आणि अँडी कॅडीक यांनी 73 व्या षटकात विकेट गमावल्या. त्याच्या पुढच्याच षटकात वॉन 69 धावा करुन बाद झाले. पण यानंतर डॅरेन गॉफ आणि ख्रिस सिल्व्हरवूड यांनी प्रत्येकी एक चौकार मारत इंग्लंडला 5 चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला.

https://twitter.com/mohanstatsman/status/1218370285906169856

एक महिन्यांनी क्रोनिएने दिली मॅच फिक्सिंगची कबूली –

या सामन्यानंतर एक महिन्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्रोनिएने मॅच फिक्सिंग केली असल्याची कबूली दिली. त्याने कबूली दिली त्याने एका बूकीबरोबर सामन्यातील 5 पैकी 3 दिवस पावसामुळे वाया गेले असले तरी सामन्याचा निकाल लागण्याची डिल केली होती.

अखेर अनेक खेळाडूंनी क्रोनिएच्या विरुद्ध साक्ष दिल्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती. यानंतर 2 वर्षांच्या आतच एका विमान अपघातात क्रोनिएचे निधन झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---