भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ५१ धावांवर बाद झाला.
याबरोबर त्याने या कसोटीत २०० धावा केल्या. पहिल्या डावात विराट १४९ धावांवर बाद झाला होता.
याबरोबर विराटने तब्बल ११वेळा कसोटी सामन्यात २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा २००+ धावा करणारे भारतीय खेळाडू
११- विराट कोहली
१०- सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड
९- विरेंद्र सेहवाग
#म #मराठी @MarathiRT @MarathiBrain @BeyondMarathi @Mazi_Marathi— Sharad Bodage (@SharadBodage) August 4, 2018
तसेच त्याने कर्णधार म्हणुन ९व्यांदा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे.
कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा २००+ धावा करणारे कर्णधार
९- विराट कोहली (सामने- ३६)
७- ब्रायन लारा (सामने- ४७)
७- रिकी पाॅंटींग (सामने- ७७)
६- डाॅन ब्रॅडमन (सामने- २४) #म #मराठी @MarathiRT @MarathiBrain @BeyondMarathi @Mazi_Marathi— Sharad Bodage (@SharadBodage) August 4, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा
टाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम