साउथँम्पटन। आज(22 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 28 वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात होत आहे. द रोज बॉल स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताने चौथ्याच षटकात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची विकेट गमावली. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला आज लवकर फलंदाजीला यावे लागले.
विराटने रोहित बाद झाल्यानंतर भारताचा डाव सांभाळताना 52 वे वनडे अर्धशतक पूर्ण केले. याबरोबरच त्याने आज खास विक्रमही केला आहे. विराटने या सामन्यात 43 धावा करताच त्याच्या इंग्लंडमध्ये 2000 आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण झाल्या आहेत.
त्यामुळे तो इंग्लंडमध्ये 2000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडने असा पराक्रम केला आहे.
विराटने आज 63 चेंडूत 67 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 चौकार मारले. पण त्याला मोहम्मद नबीने 31 व्या षटकात बाद केले. त्यामुळे भारताची आवस्था 4 बाद 135 धावा अशी झाली होती. विराट बाद झाल्यानंतर एमएस धोनीला साथ देण्यासाठी केदार जाधव सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
2645 धावा – राहुल द्रविड (46 सामने)
2626 धावा – सचिन तेंडुलकर (43 सामने)
2024 धावा – विराट कोहली* (41 सामने)
1949 धावा – सौरव गांगुली (36 सामने)
1666 धावा – एमएस धोनी* (55 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहितची विकेट नडली! भारताविरुद्ध झाला तो विक्रम
–विश्वचषक २०१९: लसिथ मलिंगाने रचला इतिहास, केला नवीन विश्वविक्रम
–विश्वचषक २०१९: अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया