पर्थ | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत आज दुसऱ्या दिवसाखेर भारताने ६९ षटकांत ३ बाद १७२ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली नाबाद ८२ तर अजिंक्य रहाणे नाबाद ५१ धावांवर खेळत आहे.
विराटचे हे २०वे अर्धशतक असून जर उद्या त्याने शतकी खेळी केली तर त्याचे हे कसोटीतील २५ वे शतक ठरेल.
८२ धावांवर ३ विकेट्स गेलेल्या असताना अजिंक्य रहाणेने विराटला अतिशय चांगली साथ दिली. त्याने विराटबरोबर १८३ चेंडूत नाबाद ९० धावांची भागीदारी केली. यातील ५१ धावा एकट्या रहाणेच्या होत्या.
ह्या ५१ धावा करताना ६ चौकार आणि १ षटकाराची अतिषबाजी केली.
रहाणेचे हे कसोटीतील १७वे अर्धशतक होते. सलग दोन डावात अर्धशतकी खेळी करण्याची रहाणेची २०१५नंतरची ही पहिलीच वेळ होती. २०१५मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी केल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३ वर्षांनी त्याने सलग दोन डावात अर्धशतके केली आहेत.
या दोन अर्धशतकी खेळीमुळे भारताचा हा मधल्या फळीतील फलंदाज पुन्हा फाॅर्ममध्ये परतल्याचे संकेत मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–निवृत्तीची चर्चा असणारा खेळाडूच बनला श्रीलंकेचा कर्णधार
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव
–सिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल!