एशिया कप स्पर्धा 2018 खुप साऱ्या गोष्टींसाठी महत्वाची ठरली. या स्पर्धेत सहा संघानी यात भाग घेतला होता. साखळीतून हॉंगकॉंग आणि श्रीलंकेचा संघ बाहेर पडला.
सुपर फोरमध्ये भारत,पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या संघानी प्रवेश मिळवला होता. अफगाणिस्तान संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी भारताविरूद्धचा सामना बरोबरीत सोडवला. तर पाकिस्तान अाणि बांग्लादेशाविरूद्ध शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली.
अफगाणिस्तानचा संघ जरी एशिया कप स्पर्धेतील अंतिम सामना खेळत नसला तरी आगामी विश्वचषक 2019 स्पर्धेत इतर संघासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. भारताला बरोबरीत रोखल्यानंतर अफगाणिस्तानची सर्वच स्तरातून प्रशंसा करण्यात आली.
2009 सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने सतत प्रगती केली आहे. 2015 साली पहिला वर्ल्ड कप खेळणाऱ्या अफगाणिस्तानने आपला प्रगतीचा आलेख उंचावत नेला असल्याचे कर्णधार असघर अफगाणने सांगितले.
याच वर्षी न्युझीलंड येथे झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत या संघाने सेमी फाइनलपर्यंत मजल मारली होती. तसेच मलेशियात झालेल्या 4 थ्या अंडर -19 एशिया कप स्पर्धा अफगाणिस्तानने जिंकली आहे.
आमचा अात्मविश्वास वाढत असून मोठ्या संघाविरूद्ध जिंकण्याचे आमचे स्वप्न नक्कीच पुर्ण होणार असल्याचे अफगाणिस्तानचा कर्णधार असघर अफगाणने पुढे बोलताना सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
–केएल राहुल म्हणाला, मी ती गोष्ट करायला नको होती…
–भारत-अफगाणिस्तान सामना टाय झाल्यानंतर रडणाऱ्या चिमुकल्या चाहत्याला भुवनेश्वर कुमारला दिली खास भेट
–टॉप ५: भारत-अफगाणिस्तानच्या सामन्यात झाले हे खास विक्रम