---Advertisement---

2024 मध्ये अनेक दिग्गजांनी घेतली निवृत्ती, यादीत ‘रोहिराट’चाही समावेश

virat kohli and rohit sharma
---Advertisement---

2024 हे वर्ष जितके चांगले, तितकेच ते क्रिकेट चाहत्यांसाठी दुःखाचे देखील होते. यावर्षी अनेक स्टार क्रिकेटपटूंनी आपल्या चाहत्यांना अशा अनेक संधी दिल्या, ज्याचा त्यांनी आनंद लुटला. अनेक स्टार क्रिकेटपटूंनी क्रिकेटला अलविदा म्हटल्याने चाहत्यांची मनं तुटली. यावर्षी निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचाही समावेश आहे. या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया, या वर्षी कोणत्या क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली.

रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांचाही या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत समावेश आहे. रोहित-विराटने 2024चा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू ‘रवींद्र जडेजा’नेही (Ravindra Jadeja) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

याशिवाय भारताचा स्टार फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan), यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik), यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) या खेळाडूंनी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.

भारतीय क्रिकेटपटूंशिवाय अनेक विदेशी क्रिकेटपटूंनी 2024 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ‘डेव्हिड वॉर्नर’ने (David Warner) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. याशिवाय इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ‘जेम्स अँडरसन’नेही (James Anderson) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर अँडरसनने 2025च्या मेगा लिलावात आपले नाव दिले होते. परंतु तो विकला गेला नाही. याशिवाय इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali), न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनर, ‘टीम साऊदी’नेही (Tim Southee) यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) आणि अष्टपैलू इमाद वसीम (Imad Wasim) या खेळाडूंनी देखील 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

गाबा कसोटीत टॉस जिंकून भारतानं गोलंदाजी का निवडली? रोहित शर्मानं सांगितलं कारण
“मला संधी मिळाली तर…”, टीम इंडियातील कमबॅकवर अजिंक्य राहणेचं सूचक वक्तव्य
WPL Auction; कधी आणि कुठे होणार लिलाव, जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---