14 जूनपासून सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी अनेक संघ सरावासाठी सामने खेळत आहेत. 8 दिवसांवर आलेल्या या स्पर्धेपूर्वी मात्र अर्जेंटीनाच्या संघाने इस्राईल विरूध्दचा सामना खेळण्यास नकार दिला आहे.
अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू आणि बार्सिलोना स्टार लियोनल मेस्सीच्या विरोधात धमक्या आल्याने तसेच निदर्शने होत असल्याने हा सामना रद्द करण्यात आला.
अर्जेंटीनाचा हा सामना शनिवारी इस्राईल विरूध्द जेरूसलेमधील हैफा येथे खेळला जाणार होता. या सामन्याची सगळी तिकीटे अवघी 20 मिनीटांतच विकली गेली.
काही राजकीय कारणामुळे हा सामना रद्द झाला. तसेच पॅलेस्टाईन मधील एका चाहत्याने मेस्सीच्या नावाचा शर्ट जाळला. ही घटना सामना जेथे होणार होता तेथे झाली. पॅलेस्टाईन आणि इस्राईल हे दोघेही जेरुसलेमला आपली राजधानी मानतात.
https://twitter.com/faymdq/status/1004123092044668928
हा सामना व्हावा अशी इस्राईलचे पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी अर्जेंटीनाचे पंतप्रधान मॉरिसिओ मॅक्री यांना विचारले देखील होते.
अर्जेंटीनासोबत मैत्रीचे संबंध टिकवण्यासाठी इस्राईलच्या पंतप्रधानांनी असे केले होते. सामना होणार या बातमीचे गाझामध्ये आनंदात स्वागत करण्यात आले.
पॅलेस्टाईनच्या फुटबॉल असोसिएशनने (पीएफए) अर्जेंटीनाचा खेळाडू मेस्सी आणि त्यांचा संघ यांचे सामना रद्द झाल्याने आभार मानले.
“मुल्ये, नैतिकता आणि खेळ यांचे संरक्षण करणे हे जरूरी आहे. म्हणून लाल कार्ड दाखवून इस्राईल विरूध्दचा हा सामना रद्द करत आहे”,असे पीएफएचे अध्यक्ष जिब्रील राजौब महणाले.
हा अर्जेंटीनाचा फिफा विश्वचषकापूर्वी शेवटचा सामना होता.
जेरुसलेम हा विषय खूपच गंभीर आहे. पॅलेस्टाईनच्या पूर्व भागाला भविष्यातील राजधानी म्हणून बघितले जाते. यातच तेथील सामना हैफा येथे हलवल्याने या विचाराला राग व्यक्त होत आहे.
तसेच जेरुसलेम हे इस्राईलची राजधानी म्हणून ओळखले जावे यासाठी मागच्याच महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला अमेरिकेचे दूतावास केंद्र बनवले.