टॉप बातम्याहॉकी

“आम्हाला कुणी ओळखलेसुद्धा नाही”, ऑलिम्पिक विजेत्या हॉकीपटूने मांडली मनातली खदखद

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल आणि लोक एका रात्रीत स्टार बनतील, हे सांगणे कठीण आहे. असेच काहीसे घडले होते, डॉली चायवाला याच्यासोबत. नागपूरचा डॉली चायवाला त्याच्या लोकांना चहा देण्याच्या खास शैलीमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. एके दिवशी बिल गेट्स यांनी त्याच्या स्टॉलवर चहा पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्या दिवसापासून त्याचे नशीब पालटले. आता याच डॉली चायवालामुळे ऑलिम्पिक विजेत्या भारतीय हॉकीपटूंचे हृदय तुटले आहे. नेमके काय घडले?

खरे तर, बिल गेट्स यांच्या व्हिडिओनंतर डॉली चायवाला प्रसिद्धीझोतात आणि रात्रीत लखपती बनला. त्याचे नशीब असे बदलले की आज तो प्रायव्हेट जेटने प्रवास करतो. डॉली चायवाला कुठेही गेला तरी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात. भारतीय हॉकी संघाचा खेळाडू हार्दिक सिंग हादेखील अशाच एका प्रसंगाला सामोरे गेला होता. पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतीय संघासोबत मायदेशी परतत असताना ही घटना घडली होती.

या प्रसंगाबाबत सांगताना भारतीय हॉकी संघाचा मिडफिल्डर हार्दिकने एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतात परत येत असताना विमानतळावर डॉली चायवालासोबत फोटो काढण्यासाठी लोक उत्सुक होते. पण आम्हाला कोणी ओळखलेही नाही. हार्दिक म्हणाला, ‘मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. मी, मनप्रीत आणि काही लोक विमानतळावर होतो. डॉलीही तिथे होता. फोटोसाठी डॉली चायवालाजवळ लोकांची गर्दी होत होती, पण आम्हाला कोणी ओळखलेसुद्धा नाही. आम्हाला खूप लाज वाटली.’

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळाले
भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार कामगिरी दाखवत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. याआधी त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय कसोटी संघात सर्वाधिक क्रिकेटपटू कोणत्या राज्याचे आहेत?
यष्टीरक्षक पंतचा सल्ला आला कामी, बांगलादेशच्या कर्णधाराला अश्विनने असे फसवले जाळ्यात
BGT 2024-25; भारताला घाबरला ऑस्ट्रेलिया? स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य!

Related Articles