इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी वाईट बातमी आहे.
जसप्रीत बुमराहच्या बोटावर झालेली शस्त्रक्रिया अयशस्वी झाली आहे.
यामुळे जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.
नुकतेच आयर्लंड विरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात बुमराहच्या बोटाला दुखापत झाली होती.
मात्र बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार जसप्रीत बुमराहच्या बोटावर झालेली शस्त्रक्रिया अयशस्वी झाली आहे.
जसप्रीत बुमराहला या दुखापतीतून सावरण्यासाठी तीन ते चार आठवडे लागतील असे बीसीसीआयचा हा अधिकारी म्हणाला.
असे असले तरी बुमराह या कसोटी मालिकेत खेळणार की नाही हे अजून निश्चित झाले नाही. याबाबतची बीसीसीआयने कोणतीही घोषणा केली नाही.
इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर झालेल्या १८ सदस्सीय भारतीय संघात बुमराहचा समावेश केला होता. तो दुसऱ्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघासाठी उपलब्ध होणार होता.
भारताच्या इंग्लड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला १ ऑगस्टपासून सुरवात होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पाकिस्तानी गोलंदाजाची चालाखी, पहा कसे केले सेलिब्रेशन
-एमएस धोनीची फॅमीली मेंबर करत आहे मुंबई इंडियन्ससाठी चिअर